उस्मानाबादेत विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : एक 22 वर्षीय विवाहित महिला (नाव- गाव गोपनीय) ही दि. 15 ऑगस्ट रोजी रात्री आपल्या घरात मुलांसह झोपली होती. रात्री 23.00 वा. सु. गावातीलच एका पुरुषाने त्या महिलेच्या घराचा दरवाजा ढकलून उघडून त्या महिलेवर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीच्या पतीसह मुलास ठार मारण्याची धमकी तीला दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि. 18 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 376, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
फसवणूक

तामलवाडी  : काटी, ता. तुळजापूर ग्रामस्थ महेश कदम यांनी त्यांची स्विफ्ट कार  क्र. एम.एच. 12 एफएफ 5184 ही गावकरी- राजेंद्र भंडारी यांना विकण्याचा तोंडी व्यवहार ठरला होता. त्या पोटी भंडारी यांनी दि. 31 जानेवारी 2019 पासून वेळोवेळी 3,18,100 ₹ रक्कम कदम यांना देउन त्यांची कार ताब्यात घेतली असता कदम यांनी प्रत्यक्ष विक्री व्यवहारास टाळाटाळ केली. त्यानंतर दि. 18 ऑगस्ट 2021 रोजी महेश कदम हे भंडारी यांच्या ताब्यातील आपली कार परत घेउन गेले. अशा मजकुराच्या राजेंद्र भंडारी यांची पत्नी लक्ष्मी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 406 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपघात

नळदुर्ग  : शफिक मातोळे, रा. जकेकुर, ता. उमरगा हे दि. 23 जुलै 2021 रोजी 08.15 वा. सु. अणदुर येथील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 13 बीजी 2800 ही चालवत जात होते. दरम्यान अज्ञात चालकाने टँकर क्र. एन.एल. 01 एबी 3235 हा निष्काळजीपने चालवून मातोळे यांच्या मोटारसायकलाला पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या मातोळे यांनी दि. 18 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : प्रकाश ढाकणे, रा. तुळजापूर हे दि. 08 ऑगस्ट रोजी 20.30 वा. सु. नरळीबाग, तुळजापूर येथील रस्त्याने मोटारसायकलने प्रवास करत होते. दरम्यान अज्ञात ट्रकने ढाकणे यांच्या मो.सा. ला समोरुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या ढाकणे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web