लैंगीक अत्याचार,अपहरण,मारहाण गुन्हे दाखल 

 

लैंगीक अत्याचार

उस्मानाबाद -  जिल्ह्यातील एका पुरुषाने गावातीलच एका 50 वर्षीय महिलेस (नाव- गाव गोपनीय) विवाहाचे आमिष दाखवून गेल्या 15 वर्षांपासून तीच्याशी लैंगीक संबंध ठेवले. त्या महिलेने विवाहाचा आग्रह धरला असता त्याने तीला जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावरुन पिडीत महिलेने 23 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 504, 506 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नेांदवला आहे.

अपहरण

उस्मानाबाद - विदर्भातून उस्मानाबाद जिल्ह्यात ऊस तोडीस आलेल्या मजुराच्या 15 वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) 22 मार्च रोजी 19.00 वा. सु. एका तरुणाने फुस लावून अपहरण केले. तर दुसऱ्या घटनेत जिल्ह्यातील एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 18 मार्च रोजी 10.30 वा. सु. घरा बाहेर पडल्यानंतर ती पुन्हा घरी परतली नाही. यावरुन तीचे कोणी अज्ञाताने अज्ञात कारणांसाठी अपहरण केले असावे. अशा मजकुराच्या दोन्ही अपहृत मुलींच्या पित्यांनी 23 मार्च रोजी संबंधीत पो.ठा. येथे दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपघात

तुळजापूर: चालक- समाधान श्रीकांत शिराळ, ता. बार्शी यांनी 20 मार्च रोजी 15.00 वा. सु. काक्रंबा पर्यायी मार्गावर कार क्र. एम.एच. 13 बीएन 6522 ही निष्काळजीपणे चालवून वैभव संजय कळसे, वय 25 वर्षे व नरेश बसलिंग अनंतवार, दोघे रा. हानेगाव, देगलुर, जि. नांदेड हे प्रवास करत असलेल्या मोटारसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात वैभव कळसे हे मयत झाले तर नरेश अनंतवार हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या विजय सायलु धडगे, रा. हानेगाव यांनी 23 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
मारहाण

 परंडा: भांडगाव, ता. परंडा येथील संतोष व विनोद भास्कर भानवसे हे दोघे बंधु 22 मार्च रोजी 19.00 वा. सु. आपल्या घरासमोर थांबले होते. यावेळी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गावकरी- तुकाराम पांडुरंग कोळेकर यांनी भानवसे बंधुंना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संतोष भानवसे यांनी 23 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web