सात आरोपींना आर्थिक दंडाची शिक्षा

 
Osmanabad police

उस्मानाबाद : सात  गुन्ह्यांतील 7सात  आरोपींस आज दि. 26 ऑगस्ट रोजी संबंधीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आर्थिक दंडाच्या शिक्षा सुनावल्या. यात निष्काळजीपने वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन करणाऱ्या शिवराज माळी, रा. तुरोरी यांना 500 ₹, सार्वजनिक ठिाकणी रहदारीस धोका निर्माण करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन करणाऱ्या विठ्ठल गायकवाड यांना 200 ₹ तर सार्वजनिक ठिकाणी धोकादायपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन करणाऱ्या ईस्माईल चौधरी यांना 200 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उमरगा यांनी सुनावली आहे.

            तुळजापूर पो.ठा. हद्दीत कोविड मनाई आदेशांचे उल्लंघन करुन कोविड संसर्गाची निष्काळजीपनाची कृती करुन भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन करणाऱ्या मैनउद्दीन शेख, दादासाहेब नावाज, विनायक ढगे, रामचंद्र कोलार अशा चौघांना प्रत्येकी  1,000 ₹ दंडाची व दंड न भरल्यास 7 दिवस साध्या कारावासाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर यांनी सुनावली आहे.

From around the web