लैंगीक अत्याचार केल्याने अल्पवयीन मुलगी गरोदर

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) मागील काही महिन्यांपासून तीच्या मामाच्या गावी होती. दरम्यान तीच्या गावच्या तरुणाने ती राहत असलेल्या मामाच्या गावी जाउन तीच्या सोबत वेळोवेळी लैंगीक संबधं ठेवले. यातून ती मुलगी गरोदर झाल्याने त्या तरुणाने तीला गर्भपाताची औषधे खाऊ घालून तीचा गर्भपात केला. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या पालकांनी दि. 23 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 311, 312, 313, 314 सह पोक्सो कायदा कलम- 4, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
चोरी

उमरगा  : जेकेकुरवाडी, ता. उमरगा येथील प्रल्हाद दत्तुपंथ काळे, वय 54 वर्षे हे दि. 22 ऑगस्ट रोजी 19.00 वा. सु. जेकेकुर येथील एमआयडीसी परिसरात पायी फेरफटका मारत होते. यावेळी त्यांच्या पाठीमागून विना नोंदनीक्रमांच्या मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी पुरुषांनी, “आप कहाके है सहाब आपके पास तो बहोत पैसा है!” असे काळे यांना म्हणुन बतईचा धाक दाखवून त्यांच्या जवळील 15 ग्रॅमच्या 2 सुवर्ण अंगठ्या, एक सॅमसंग भ्रमणध्वनी व 50,000 ₹ रोख रक्कम हिसकावून पसार झाले. अशा मजकुराच्या प्रल्हाद काळे यांनी दि. 23 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web