पाच गुन्ह्यातील आरोपींना आर्थिक दंडाची शिक्षा
परंडा : कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण करण्याची निष्काळजीपनाची कृती करुन भा.दं.सं. कलम- 269 चे उल्लंघन करणाऱ्या 1) राजेंद्र सोपान माळी 2) अशोक ज्ञानदेव शिंदे 3) अकिल आयुब डोंगरे या तीघांना प्रत्येकी 1,000 ₹ दंडाची शिक्षा तर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोका- अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे वाहने उभी करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन करणाऱ्या 4) सलिम कलीम खान 5) ज्ञानेश्वर दत्तात्रय चव्हाण यांनी प्रत्येकी 200 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी आज दि. 04 ऑगस्ट रोजी सुनावली आहे.
कोविड मनाई आदेश झुगारुन पानटपरी चालू ठेवणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल
परंडा : कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी आस्थापना चालू ठेवण्याची वेळ निश्चित केली असून त्या संबंधी विविध मनाई आदेश जारी केले आहेत. ते मनाई आदेश झुगारुन 1) दत्तात्रय पंढरी केमदारणे 2) हनुमंत भगवान माळी, दोघे रा. लोणी, ता. परंडा यांनी दि. 03 ऑगस्ट रोजी लोणी येथील आपापल्या ताब्यातील पानटपऱ्या व्यवसायास चालू ठेवले असलेले परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
अवैध मद्य विरोधी कारवाई
परंडा : नविन गौड, रा. परंडा हे दि. 03 ऑगस्ट रोजी 19.30 वा. सु. परंडा येथील बार्शी रस्त्यालगतच्या एका पेट्रोलियम विक्रीकेंद्रासमोर देशी दारुच्या 20 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्याच्या बाटल्या जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.