उस्मानाबाद : जिल्हाभरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

 
s

उस्मानाबाद  - जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यात चोरी, दरोडा असे मालासंबंधी व इतर गुन्हे केलेले अनेक  आरोपी व गुन्हेगार उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी असुन यातील अनेक आरोपी हे उस्मानाबाद तसेच इतर जिल्हा, राज्यांस तपासकामी हवे असतांत. परंतु  त्यांचा निश्चित ठावठिकाणा समजुन येत नसल्याने त्यांना पकडने जिकरीचे असते. अशा आरोपींसोबतच इतर संशयीत व्यक्तींचे इतीवृत्त (र्हिस्ट्रीशीट) पोलीस दलाने उघडलेले असुन या व्यक्तींचा सध्याचा व्यवसाय, वर्तनुक यावर पोलीस लक्ष देउन असल्याने वेळोवेळी त्यांना अचानक भेटून याची खात्री केली जाते.

या पार्श्वभुमीवरपोलीस अधीक्षक . राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनातून काल गुरुवार  दि. 26 ऑगस्ट रोजी 23.00 ते आज दि. 27 ऑगस्ट रोजी 05.00 वा. दरम्यान जिल्हाभरात कोंम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. अशा संशयीतांची यादी स्थानिक गुन्हे शाखे मार्फत संबंधीत पोलीस ठाण्यांत पाठवण्यात आली. या ऑपरेशनसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी- अंमलदारांना नेमण्यात येउन आपापल्या हद्दीतील आरोपींची 52 घरे- वस्त्या यांना अचानक भेटी देउन संबंधीत संशयीतांची खातरजमा करण्यात आली. हद्दीतील लॉजेस, 10 बसस्थानके व रेल्वे स्थानक, 45 ढाबे, 44 पेट्रोलियम विक्री केंद्रे, 34 बँका, 53 एटीएम केंद्रांस अचानक भेटी देउन तसेच महामार्गावरील संशयीत वाहनांची सुरक्षा व्यवस्था तपासण्यात आली. या मोहिमे दरम्यान पोलीसांनी  30  हिस्ट्रीशीटर व्यक्तींना  त्यांच्या निवासस्थानी भेट देउन त्यांच्या सध्याच्या वर्तनाची शहानिशा करण्यात आली. तसेच इतर जिल्ह्यांत गुन्हे करणाऱ्या 2 व्यक्तींविरुध्द संबंधीत जिल्ह्यास 2 ‘अ’ रोल तर इतर जिल्ह्यात गुन्हे करुन उस्मानाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या 2 व्यक्तींविरुध्द  2 ‘ब’ रोल संबंधीत पोलीस ठाण्यास पाठवण्यात आले आहेत.  
 

 9 गुन्ह्यांतील 9 आरोपींस आर्थिक दंडाच्या शिक्षा

: 9 गुन्ह्यांतील 9 आरोपींस आज दि. 27 ऑगस्ट रोजी संबंधीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आर्थिक दंडाच्या शिक्षा सुनावल्या. यात ढोकी पो.ठा. हद्दीत सार्वजनिक ठिकाणी रहदारीस धोका निर्माण करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन करणाऱ्या सुरेश पवार, रा. तडवळा (क.) व गणेश टोतेवाडे, रा. परंडा या दोघांना प्रत्येकी 200 ₹ दंडाची शिक्षा तर ढोकी पो.ठा. हद्दीत कोविड संसर्गाची शक्यता निर्माण करुन भा.दं.सं. कलम- 269 चे उल्लंघन करणाऱ्या धनराज डोलारे व रफीक सय्यद, दोघे रा. ढोकी यांना प्रत्येकी 500 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी सुनावली आहे.

            तामलवाडी पो.ठा. हद्दीत कोविड संसर्गाची शक्यता निर्माण करुन भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन करणाऱ्या दोन आरोपींस प्रत्येकी 500 ₹ दंडाची शिक्षा तर तामलवाडी पो.ठा. हद्दीत निष्काळजीपने वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन करणाऱ्या एका आरोपीस 1,000 ₹ दंड आणि सार्वजनिक रहदारीस धोका निर्माण करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन करुणाऱ्या एका आरोपीस 200 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर यांनी सुनावली आहे.

उमरगा पो.ठा. हद्दीत धोकादायकपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन करणाऱ्या संतोष बोरुटे, रा. कसगी यांना 500 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उमरगा यांनी सुनावली आहे.

From around the web