परंड्यात एकाची ऑनलाईन फसवणूक

 
Osmanabad police

परंडा: मेघराज भागवत घोरपडे, रा. घारगाव, ता. परंडा यांना दि. 31 मे ते 04 जून या काळात  एका अज्ञात व्यक्तीने सायकल विक्रीचे ऑनलाईन आमिष दाखवल्याने त्याने मागणी केल्याप्रमाणे  घोरपडे यांनी त्यास वेळोवेळी एकुण 20,097 ₹ रक्कम युपीआय प्रणालीद्वारे दिली. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे घोरपडे यांच्या लक्षात आले. अशा मजकुराच्या मेघराज घोरपडे यांनी दि. 06 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरी

परंडा: भानुदास नरहरी माळी, रा. अंतरगाव, ता. भुम यांची घरासमोरील हिरो होंडा मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्स 9471 व शेजारी- हनुमंत गोरे यांच्या घरासमोरील दोन शेळ्या व एक बोकड दि. 05- 06.06.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या भानुदास माळी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 उस्मानाबाद : सचिन राजेंद्र देशमुख, रा. गणेश नगर, उस्मानाबाद यांच्या गट क्र. 340 मधील शेतातील गोठ्याबाहेर बांधलेली म्हैस व रेडकु दि. 04- 05.06.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या सचिन देशमुख यांनी दि. 06 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मारहाण 

 मुरुम: राजेंद्र वालचंद राठोड, रा. तुगाव तांडा, ता. उमरगा हे दि. 06 जून रोजी 14.00 वा. पत्नीसह आपल्या घरात होते. यावेळी त्यांचे भाऊ- विकास व भास्कर या दोघा भावांसह पुतणे- रवी व अविनाश अशा चौघांनी जुना वाद उकरुन काढून राजेंद्र यांच्या घरात घुसून त्यांसह त्यांच्या पत्नीस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी पाईपने मारहान करुन त्यांस ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या राजेंद्र राठोड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web