उस्मानाबाद जिल्ह्यात २१ मार्च रोजी दोन अपघातात एक ठार, एक जखमी 

 

 नळदुर्ग: सुरेश ग्यानदेव लुगडे, रा. कुरनुर, ता. अक्कलकोट हे 07 मार्च रोजी 19.30 वा. सु. इटकळ- सोलापूर रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 13 डीपी 8451 ने प्रवास करत होते. दरम्यान खानापूर फाटा येथे त्यांच्या मो.सा. ला अज्ञात चालकाने मिनीट्रक क्र. एम.एच. 25 पी 4435 ही निष्काळजीपणे चालवून सुरेश लुगडे यांच्या मो.सा. ला समोरुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या सुरेश लुगडे यांची पत्नी- संगीता यांनी 20 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 ढोकी: भुम येथील रत्नाकर दत्तात्रय फुसके व सुरेखा रत्नाकर फुसके, वय 43 वर्षे हे दोघे पती- पत्नी दि. 10.01.2021 रोजी 22.30 वा. सु. घोगरेवाडी शिवारातील रस्त्यावरुन मोटारसायकल क्र. एम.एच. 13 एपी 1931 ने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात चालकाने स्कुटर क्र. एम.एच. 25 एटी 6849 ही निष्काळजीपणे, हयगईने चालवून रत्नाकर फुसके चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला पाठीमागून धडक दिल्याने पाठीमागे बसलेल्या सुरेखा फुसके या खालीपडल्याने डोक्यास गंभीर मार लागुन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाल्या. या अपघातानंतर स्कुटर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या रत्नाकर फुसके यांनी 20 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


चोरी

मुरुम: मुरळी, ता. उमरगा येथील बहादुर मकबुल मोजणीदार यांच्यासह गावकरी- रमेश औरादे यांच्या गावातील साठवण तलावातील ल्क्ष्मी कंपनीच्या 5 अश्वशक्ती क्षमतेच्या 2 पाणबुडी विद्युत पंप व शेजारील शेजारील शेतकरी- इरफान मोजणीदार यांच्या शेतातील तुषारसिंचन संच असा 28,000 ₹ चा माल अज्ञात व्यक्तीने 18- 19 मार्च रोजी दरम्यानच्या रात्री चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या बहादुर मोजणीदार यांनी 20 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण

 वाशी: सरमकुंडी, ता. वाशी येथील हनुमंत बाबुराव शिंदे हे 20 मार्च रोजी 19.30 वा. सु. सरमकुंडी फाटा येथे असतांना पुर्वीच्या वादाच्या कारणावरुन भाऊबंद- किरण विनायक शिंदे, आश्विनी शिंदे, कडुबाई शिंदे या तीघांनी हनुमंत शिंदे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या हनुमंत शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

 
 

From around the web