गुटखा  वाहतूक करणाऱ्या एकास अटक 

 
Osmanabad police

तुळजापूर: तुळजापूर शहरातून प्रतिबंधीत अन्नपदार्थ (गुटखा) वाहतुक होणार असल्याची गोपनीय खबर तुळजापूर पो.ठा. च्या पथकास दि. 24.05.2021 रोजी मिळाली. यावर तुळजापूर पो.ठा. चे पोनि- श्री. मनोजकुमार राठोड हे पथकासह 08.15 वा. सु. तुळजापूर येथील उस्मानाबाद पर्यायीमार्गावरील उड्डान पुलाजवळ सापळा लावला. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या एका इंडीगो कार क्र. एम.एच. 25 आर 6235 ची संशयावरुन झडती घेतली असता चालक- अमन महेबुब मुर्शद, रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर हा कारमधुन एक पोते भरलेला महाराष्ट्रात प्रतिगंधीत असलेला अन्नपदार्थ (गुटखा) वाहुन नेत असलेला आढळला.

            यावरुन पोलीसांनी सदर गुटखा, वाहन जप्त करुन अन्न औषध प्रशासनास माहिती कळवली असता अन्न सुरक्षा अधिकारी- श्री . प्रमोदकुमार काकडे यांनी सदर अन्न पदार्थ हा प्रतिबंधीत गुटखा असल्याची खात्री करुन सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 328, 272, 273, 188 सह वाचन अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


अवैध मद्य विरोधी कारवाई

 उमरगा: संजीव बिराजदार, रा. ममदापुर, ता. निलंगा हे दि. 24 मे रोजी मुळज, ता. उमरगा येथील एका दुध संकलन केंद्राजवळ अवैध विक्रीच्या उद्देशाने विदेशी दारुच्या 35 बाटल्या (किं.अं. 4,900 ₹) बाळगलेले असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web