कळंब येथे आडत दुकानदाराच्या पहारेकराचा खून 

 
Osmanabad police

कळंब: मछिंद्र छगन काळे, वय 45 वर्षे, रा. फरीदनगर, कळंब हे दि. 05 जून रोजी 02.04 वा. सु. कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब येथील अजय जाधव यांच्या आडत दुकानाच्या कुंपनाच्या आवारात पहारा देत झोपलेले होते. 

दरम्यान अज्ञात व्यक्तीने तेथे येउन मछिंद्र माने यांना मारहाण करुन त्यांच्यावर पिस्तुलने गोळी झाडून त्यांचा खून केला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- विशाल मछिंद्र माने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


दहिटना येथे हाणामारी 

नळदुर्ग: महादेव आंबादास कांबळे, रा. दहिटना, ता. तुळजापूर हे दि. 21.05.2021 रोजी 20.00 वा. सु. आपल्या घरासमोर थांबले होते. यावेळी शेतातील बांध नांगरल्याच्या कारणावरुन गावकरी- मारुती व सचिन मारुती कांबळे या दोघा पिता- पुत्रांनी महादेव कांबळे यांना लोखंडी गज, काठीने मारहान करुन जखमी केले. यावेळी महादेव यांच्या बचावास त्यांची बहिण आली असता नमूद दोघांनी त्यांनाही ‍शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या महादेव कांबळे यांनी दि. 05 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web