कलदेव निंबाळामध्ये शेतकऱ्याचा खून
मुरुम : कलदेव निंबाळा येथील ग्रामस्थ निळकंठ विठोबा कांबळे वय 50 वर्षे हे दिनांक 09 ऑगस्ट रोजी 21.30 वा नित्या प्रमाणे शेतात झोपण्यास गेले होते. दुस-या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह शेतात आढळला असता दोन्ही कानातुन रक्तस्त्राव झाल्याचे व उजव्या कानावर जखम असल्याचे दिसुन आले. यावरुन त्यांचा खून झाला असु शकतो .अशा मजकुराच्या मुलगा –साईनाथ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दोन ठिकाणी हाणामारी
वाशी : शेलगाव येथील श्रीमती ज्योती भैरट या दिनांक 8 ऑगस्ट रोजी 18.00 वा घरात असतांना भाउबंद सतीश, रवी, सुहास, अरुण, बालाजी, दिनकर भैरट यांनी ज्योती यांच्यासह त्यांच्या आईस शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देवुन लाथा बुक्यांनी, गजाने मारहाण करुन दारातील ट्रॅक्टरची मोडतोड केली. अशा मजकुराच्या प्रथम खबरे वरुन भादसं 324, 452, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : तोरंबा येथील नारायण क्षिरसागर हे दिनांक 10 ऑगस्ट रोजी 01.30 वा गावातील शाळेसमोरुन जात असतांना गा्रमस्थ शरद गायकवाड यांनी नारायण यांना धक्का बुक्की करुन जातीवाचक शिवीगाळ केली अशा मजकुराच्या प्रथम खबरे वरुन भादसं व ॲट्रॉसीटी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.