लॉकडाउन: ३ मे रोजी १३८ पोलीस कारवायांत 42 हजार दंड वसूल 

 
लॉकडाउन: ३ मे रोजी १३८ पोलीस कारवायांत 42 हजार दंड वसूल

उस्मानाबाद -  लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 03.05.2021 रोजी खालील पाच प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: एकुण 17 कारवायांत- 3,400/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: एकुण 41 कारवायांत- 20,500/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 69 कारवायांत 14,400/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 9 कारवायांत 1,800/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

5)जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे: एकुण 2 कारवायांत- 2,000/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

अपघात

वाशी: भागवत देविदास गव्हाणे, रा. पिंपळगाव (क.), ता. वाशी हे दि. 02.05.2021 रोजी 20.00 वा. सु. पिंपळगाव फाटा येथील रस्त्याने पायी जात होते. दरम्यान अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 44 पी 8387 ही निष्काळजीपणे, भरधाव वेगात चालवून भागवत गव्हाणे यांना पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर अज्ञात चालक मोटारसायकलसह अपघातस्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या भागवत गव्हाणे यांनी 03 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web