लॉकडाउन: २७ एप्रिल रोजी ९६ पोलीस कारवायांत 32 हजार दंड वसूल 

 
लॉकडाउन: २७ एप्रिल रोजी ९६ पोलीस कारवायांत 32 हजार दंड वसूल

उस्मानाबाद -  लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 27.04.2021 रोजी खालील पाच प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: एकुण 21 कारवायांत- 4,200/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: एकुण 13 कारवायांत- 6,500/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 52 कारवायांत 11,500/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 5 कारवायांत 5,000/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

5)जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे: एकुण 5 कारवाईत- 5,000/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

 वाशी: विजय नारायण तळेकर, रा. पारगाव, ता. वाशी हे 27 एप्रील रोजी पारगाव येथे अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 8 बाटल्या (किं.अं. 416 ₹) बाळगलेले असतांना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.

 
कळंब: अशोक विठ्ठल गायकवाड, रा. तांदुळवाडी, ता. कळंब हे 27 एप्रील रोजी गावशिवारातील ‘साई हॉटेल’ येथे अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 28 बाटल्या (किं.अं. 2,860 ₹) बाळगलेले असतांना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले.

 उस्मानाबाद -  कुनाल अनिल पवार, रा. उस्मानाबाद हे 27 एप्रील रोजी उस्मानाबाद शहरातील तांबरी विभाग परिसरात अवैध विक्रीच्या उद्देशाने 10 लि. गावठी दारु (किं.अं. 500 ₹) बाळगलेले तर याच दिवशी मिनाबाई खंडु कांबळे, रा. इंदीरानगर, उस्मानाबाद या आपल्या राहत्या घरासमोर अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी- विदेशी दारुच्या 73 बाटल्या (किं.अं. 5,493 ₹) बाळगलेल्या असतांना उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास आढळल्या.

            यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web