लॉकडाउन: १ मे  रोजी ९६ पोलीस कारवायांत २९ हजार दंड वसूल 

 
लॉकडाउन: १ मे रोजी ९६ पोलीस कारवायांत २९ हजार दंड वसूल

उस्मानाबाद- लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 01.05.2021 रोजी खालील चार प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: एकुण 19 कारवायांत- 3,800/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: एकुण 27 कारवायांत- 13,500/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 45 कारवायांत 9,000/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 5 कारवायांत 2,500/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.


अल्पवयीन मुलीचे अपहरण

 जिल्ह्यातील एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) घरातील कुटूंबीयांस काहीएक न सांगता दि. 01 मे रोजी 06.00 वा. सु. घरातून निघून गेली. ती घरी लवकर परत न आल्याने कुटूंबीयांनी तीचा शोध घेतला असता गावातीलच एका युवकाने तीचे अपहरण केले असल्याचे समजले. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पालकाने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाया

 उस्मानाबाद पोलीसांनी काल शनिवार दि. 01.05.2021 रोजी जिल्हाभरात अवैध मद्य विरोधी 5 कारवाया करुन कारवायातील अवैध मद्य जप्त करुन 6 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 5 गुन्हे नोंदवले आहेत.

1) सुनिल भिमराव पवार, रा. हगलुर तांडा, ता. तुळजापूर हे गावातील आपल्या किराणा दुकानासमोर अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 24 बाटल्या (किं.अं. 1,248 ₹) बाळगलेले तर दुसऱ्या घटनेत जितेंद्र आण्णाप्पा खानापुरे व बंकट नाशिवंत बेडगे, दोघे रा. जळकोट, ता. तुळाजापूर हे नळदुर्ग- जळकोट रस्त्यालगतच्या जयशंकर ढाब्याजवळील झाडाखाली अवैध विक्रीच्या उद्देशाने विदेशी दारुच्या 11 बाटल्या (किं.अं. 2,260 ₹) बाळगलेले असतांना नळदुर्ग पोलीसांना आढळले.

2) ज्ञानदेव मारुती खोगरे, रा. नाईचाकुर, ता. उमरगा हे नाईचाकुर शिवारात अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 18 बाटल्या (किं.अं. 936 ₹) बाळगलेले तर दुसऱ्या घटनेत सिद्राम श्रीमंत माशाळे, रा. कसगीवाडी, ता. उमरगा हे गावशिवारात अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 780 ₹) बाळगलेले असतांना उमरगा पोलीसांना आढळले.

3) अब्दुल अबासअली जेवळे, रा. आलुर, ता. उमरगा हे गावातील अक्कलकोट रस्त्यालगत 9 लि. गावठी  दारु (किं.अं. 950 ₹) अवैधपणे बाळगलेले असतांना मुरुम पोलीसांना आढळले.

From around the web