लॉकडाउन: २६ एप्रिल रोजी ७५ पोलीस कारवायांत 23 हजार दंड वसूल 

 
लॉकडाउन: २६ एप्रिल रोजी ७५ पोलीस कारवायांत 23 हजार दंड वसूल

उस्मानाबाद  - लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हा दंडाधिकारी यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 26.04.2021 रोजी खालील तीन प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: एकुण 25 कारवायांत- 5,000/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: एकुण 26 कारवायांत- 13,000/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 24 कारवाया करुन 5,100/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

येरमाळा: अण्णा सर्जेराव शिंदे, रा. वाकडी, ता. कळंब हे 26 एप्रील रोजी येरमाळा येथील उड्डाण पुलाखालील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 13 एयु 2149 वरुन देशी दारुच्या 83 बाटल्या (किं.अं. 4,316 ₹) अवैधपणे वाहुन नेत असतांना येरमाळा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पथकाने देशी दारुच्या बाटल्यासह वाहतुकीस वापरलेली मो.सा. जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द महाराष्ट मद्य निषेध व मो.वा.का.  कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी: ज्ञानेश्वर मधुकर सरवदे, रा. बोरगांव, ता. उस्मानाबाद हे 25 एप्रील रोजी आपल्या राहत्या घरासमोर देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 900 ₹) अवैधपणे बाळगलेले असतांना बेंबळी पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पथकाने देशी दारुच्या बाटल्या जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द महाराष्ट मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web