उस्मानाबाद जिल्ह्यातील अल्पवयीन दोन मुलींचे अपहरण

 
Osmanabad police

उस्मानाबाद -  जिल्ह्यातील दोन गावातील दोन 16 वर्षीय मुली (नाव- गाव गोपनीय) अनुक्रमे दि. 01 जून व 04 जून रोजी आपल्या राहत्या घरी असतांना गावातीलच दोन युवकांनी त्या दोघींना फुस लाउन त्यांचे अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या दोन्ही मुलींच्या पालकांनी दि. 04 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.


चोरी

उस्मानाबाद  - सुलतान सादिक शेख, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएफ 6157 हि दि. 02.06.2021 रोजी 17.00 ते 21.00 वा. दरम्यान त्यांच्या राहत्या घरासमारुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुलतान शेख यांनी दि. 04 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मारहान

 ढोकी: रामेश्वर बळीराम सावतर, रा. जागजी, ता. उस्मानाबाद हे दि. 04 जून रोजी 16.00 वा. सु. वडील- बळीराम सावतर यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरण करत होते. यावेळी भाऊ- भावजय- महादेव बळीराम सावतर व प्रभावती महादेव सावतर या दोघांनी शेत नांगरणीच्या कारणावरुन ट्रॅक्टर अडवून रामेश्वर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रामेश्वर सावतर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 341, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   


 

From around the web