ढोकीत अल्पवयीन मुलीचे अपहरण 

 
Osmanabad police

ढोकी  : आपल्या 17 वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) शेजारील गावच्या एका तरुणाने लग्नाचे अमिष दाखवून राहत्या घरातून तीचे दि. 12- 13 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री अपहरन केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 366 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
जिल्ह्यात दोन ठिकाणी हाणामारी 

येरमाळा  : वाघोली, ता. कळंब येथील बबन महादेव लोहार यांसह त्यांची पत्नी- रेखा, मुलगा- कृष्णा व परमेश्वर असे दि. 12 ऑगस्ट रोजी 19.30 वा. राहत्या घरी असतांना गावकरी- पाशा सय्यद यांच्यासह कुटूंबातील शकील, अमीर, सलीम, अशा चौघांनी जुन्या वादातून शिवीगाळ करुन लोखंडी नळीने, सत्तुरने मारहान करुन जखमी केले. इत्यादी मजकुराच्या बबन लोहार यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या तक्रारीवरुन भा.दं.सं. कलम- 307, 452, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा : मंगल कदम, रा. तांदुळवाडी, ता. माढा या मुलगा- लक्ष्मण सह दि. 12 ऑगस्ट रोजी 14.00 वा. सु. ब्रम्हगांव, ता. परंडा येथील गट क्र. 47 मधील शेतात होते. यावेळी ब्रम्हगांव ग्रामस्थ- बाबासाहेब जाधव यांसह त्यांच्या कुटूंबातील राहिबाई, नवनाथ, कानिफनाथ व रेश्मा कदम अशा पाच जणांनी शेत जमीनीच्या मालकी हक्काच्या वादावरुन नमूद माता- पुत्रास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी नळी, चैनने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मंगल कदम यांनी दि. 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 447, 324, 323, 504, 506, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web