कळंब : आडत पहारेकऱ्याच्या खून प्रकरणातील दोन आरोपी गजाआड

उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
 
s

उस्मानाबाद - कळंब येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील एका आड दुकानाच्या कुंपणाच्या आत पहारा करणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीचा दि ५ जून रोजी रात्री जबरी चोरी करताना चोरट्यांनी खून केला होता. यातील आरोपींना २ आरोपींना दि.६ जून रोजी शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना गजाआड केले असून यातील ९ आरोपी फरार झाले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कळंब येथील फरीद नगर येथे राहणारे मछिंद्र छगन माने, वय ४५ वर्षे,  हे दि. ५ जून रोजी रात्री २.४ वाजण्याच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब येथील अजय जाधव यांच्या आडत दुकानाच्या कुंपनाच्या आवारात पहारा देत झोपलेले होते. दरम्यान अज्ञात व्यक्तीने तेथे येऊन मछिंद्र माने यांना मारहाण करुन त्यांच्यावर पिस्तुलने गोळी झाडून त्यांचा खून केला. या प्रकरणी मयताचा मुलगा विशाल मछिंद्र माने यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलिस ठाण्यात भादं.सं. कलम- ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

तर दि.६ जून रोजी पोलिस ठाणे कळंब येथे दि.५ जून रोजी गुरनं १९५/२०२१ क.३०२ भादंवि सह ४,२५ भा.ह,का. प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपीची गोपनीय बातमीदार यांच्यामार्फत बातमी काढून गुन्ह्यातील आरोपींना अतिशय शिताफिने ताब्यात घेऊन गुन्ह्यातील इतर ९ आरोपी तपासात त्यांच्याकडून निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणला.

 स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पी.व्ही.माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शिताफीने आरोपी शाम उर्फ बांंयलर राजाभाऊ पवार वय २३ रा. मंगळवार कॉर्नर केज जि. बीड, गणेश सुब्राव पवार वय १९ रा. कल्पना नगर पारधी पिढी, कळंब यांना अटक केली आहे. तर इतर ९ आरोपी (फरार) आरोपींची माहिती घेऊन या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

 सदरील कारवाई पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन घाडगे, पोउपनि माने, पोउपनि भुजबळ, पोहेकॉ काझी, पोना सय्यद, पोना चव्हाण, पोअं जाधवर, पोअं ढिगारे, पोअं मरलापल्ले, पोअं सर्जै, पोअं सावंत, पोअं ढेकणे(TAW), चापोना, चौरे, चापोअं माने यांनी केली.

From around the web