वरुडा, भोत्रा, कोंबडवाडी येथे हाणामारीच्या घटना 

 
Osmanabad police

उस्मानाबाद -  वरुडा, ता. उस्मानाबाद येथील सुभाष भुजंग शेंडगे यांनी पुर्वीच्या वादावरुन दि. 16 जुलै रोजी 18.30 वा. सु. राहत्या गल्लीत भाऊबंद- सचिन सुरेशराव शेंडगे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. सचिन यांच्या बचावास त्याच्या पत्नी- अंजली या आल्या असता त्यांनाही शिवीगाळ करुन चाकुने ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सचिन शेंडगे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 447, 323, 504, 506 सह शस्त्र अधिनियम कलम- 4, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा - भोत्रा, ता. परंडा येथील छाया शेलार, हनुमंत शेलार, रुपाली शेलार, कल्पना शेलार, जनाबाई शेलार, विजय शेलार अशा सहा जणांनी घर मालकीच्या कारणावरुन दि. 16 जुलै रोजी 17.30 वा. सु. राहत्या गल्लीत बेगायदेशीर जमाव जमवून भाऊबंद- रोहीदास यशवंत शेलार यांसह त्यांची सुन- स्वाती व स्नेहा यांना शिवीगाळ करुन कुऱ्हाडीने, दगड, काठीने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रोहीदास शेलार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 ढोकी -  कोंबडवाडी, ता. उस्मानाबाद येथील मिसाळ कुटूंबातील परमेश्वर, रामेश्वर, अभिजीत, उषाबाई व त्यांची आई अशा पाच जणांनी दि. 15 जुलै रोजी 18.30 वा. सु. कोंबडवाडी शेत शिवारात सामाईक शेतबांधावरील झाड तोडण्याच्या कारणावरुन गावकरी- दत्ता पंडीत सोकांडे यांसह त्यांची पत्नी- अर्चना व वडील- पंडीत सोकांडे या तीघांना शिवीगाळ करुन विळा, खुरपे, टेस्टरने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दत्ता सोकांडे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  

From around the web