उमरगा,मुरूम, सातेफळ येथे चोरीच्या घटना 

 
Osmanabad police

उमरगा  : किसन व्यंकटराव बिराजदार, रा. मुन्शी प्लॉट, उमरगा यांच्या अर्धवट बांधकाम असलेल्या घरास दवाजा नसल्याचा फायदा दि. 29- 30 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री अज्ञाताने घेउन घरातील स्मार्टफोन व विजारीच्या खिशातील 10,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम : सय्यद जावेद शेख, रा. मुरुम, ता. उमरगा यांनी त्यांची हिरो होंडा सीडी डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 136 बीडी 6897 ही दि. 14- 15 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री गावातील मित्राच्या घरासमोर लावली असता अज्ञाताने चोरुन नेली. यावरुन 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : सातेफळ, ता. कळंब येथील दिलीप परशुराम कांबळे यांच्या सातेफळ गट क्र. 128 मधील शेतातील चंदनाची दोन झाडे दि. 08- 16 जुलै 2021 रोजी दरम्यान अज्ञाताने कापून चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 सह भारतीय वन अधिनियम कलम- 41, 42 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कोरोना संसर्ग होण्याची निष्काळजीपनाची कृती करणाऱ्यावर गुन्हा दाखल

परंडा  : कोविड- 19 संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जारी आदेश झुगारुन आनाळा, ता. परंडा येथील रेवननाथ वसंत झिरपे हे नाका- तोंडास मास्क न लावता दि. 30 ऑगस्ट रोजी 15.10 वा. सु. परंडा न्यायालयाच्या आवारात फिरत असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोकॉ- आण्णासाहेब लोमटे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम  खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत गुन्हा नोंदला आहे.

From around the web