येडशी, तामलवाडी, अचलेर येथे चोरीची घटना 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  -  नवनाथ विलास काळे व सुजित तोडकरी, दोघे रा. येडशी, ता. उस्मानाबाद हे दोघे कुटूंबीय दि. 21 जुलै रोजी आपापल्या घरी झोपलेले होते. रात्री 02.00 वा. सु. तीन अनोळखी व्यक्तींनी काळे व तोडकरी यांच्या घराचा कडी- कोयंडा तोडून घरात प्रवेश करुन दोघा कुटूंबीयांना दमदाटी करुन अंगावरील व कपाटातील सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 3,95,600 ₹ चा माल चोरुन नेला. यावेळी सुजित तोडकरी यांच्या पत्नीने त्या चोरट्यांचा प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांना ढकलून दिल्याने त्या जखमी झाल्या. अशा मजकुराच्या नवनाथ काळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 457, 458, 380, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी -  कोईम्बतुर- औरंगाबाद जात असलेला मालवाहक ट्रक क्र. एम.एच. 12 एसएफ 5898 हा दि. 21 जुलै रोजी 02.00 वा. सु. तामलवाडी टोलनाक्याजवळ चालक- श्यामनाथ फुलचंद पाल, रा. दरहीराम मिर्जापुर, राज्य- उत्तरप्रदेश यांनी आराम करण्यासाठी थांबवला होता. दरम्यान श्यामनाथ पाल हे आराम करत असतांना ट्रकमधील 33,934 ₹ किंमतीचे अंतर्वस्त्र असलेली 2 खोकी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या श्यामनाथ पाल यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  -  शरणाप्पा नागाप्पा सरसंबे, रा. अचलेर, ता. लोहारा यांनी घराजवळील गुदामातील लग्न समारंभासाठी ठेवलेली 42,000 ₹ किंमतीची पितळी भांडी दि. 18- 19 जुलै दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शरणाप्पा सरसंबे यांनी दि. 21 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web