तुळजापूर, देवकुरुळी, खामसवाडी येथे चोरीची घटना 

 
Osmanabad police

तुळजापूर: दिलीप बिल्डकॉन कंपनी यांनी उस्मानाबाद- सिंदफळ पर्यायी मार्गावरील खांबावर बसवलेल्या ॲमरॉन कॉन्टा बॅटरी- 28 नग, सोलर चार्जर- 14 नग, सोलर पॅनल- 2 नग, मिडीया कनव्हर्टर व इसीबी असे साहित्य दि. 25- 26.05.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या कंपनी कर्मचारी- सुरेश सपन सरकार यांनी दि. 27 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 तामलवाडी: गणपत बाबु जाधव, रा. देवकुरुळी, ता. तुळजापूर यांच्या देवकुरुळी गट क्र. 568 मधील शेत विहीवरील व कुपनलीकेतील विद्युत पंपाचे 150 फुट केबल दि. 26- 27.05.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या गणपत जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब: विजय शिवाजी भुतेकर, रा. खामसवाडी, ता. कळंब यांची होंडा ड्रिम युगा मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एए 7292 ही दि. 04- 05.03.2021 दरम्यानच्या रात्री गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या विजय भुतेकर यांनी दि. 27 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपघात

 उमरगा: चालक- गणेश अंकुश कांबळे, रा. चिंचोली (भु.), ता. उमरगा यांनी दि. 16 मे रोजी 22.30 वा. सु. बलसुर पाटी येथील रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 14 सीएफ 6991 ही निष्काळजीपणे, भरधाव वेगात चालवल्याने रस्त्यावरील अडथळ्यांना धडकली. या अपघातात गणेश कांबळे हे स्वत: जखमी होउन मो.सा. वर पाठीमागे बसलेले गावकरी- महादु तुकाराम कांबळे, वय 40 वर्षे हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या बब्रुवान महादेव कांबळे यांनी दि. 27 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web