तामलवाडी, कोरेगाववाडी,मुरुम येथे चोरीची घटना 

 
Osmanabad police

तामलवाडी : अर्जुन बाबुराव शिंदे, रा. तामलवाडी, ता. तुळजापूर यांच्यासह गावकरी- अनिल बब्रुवान काशिद यांच्या घरांचे कडी- कोयंडे अज्ञात व्यक्तीने दि. 14- 15 जुलै दरम्यानच्या रात्री तोडून शिंदे यांच्या घरातील 5 ग्रॅम सुवर्ण दागिने, 250 ग्रॅम चांदीची भांडी व पितळेची भांडी आणि काशिद यांच्या घरातील 18 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने चोरुन नेले. तसेच गावकरी- अनिल रामेश्वर करवा यांच्या गावातील दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या अर्जुन शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380, 511 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उमरगा : राम रघुनाथराव सोलंकर, रा. कोरेगाववाडी, ता. उमरगा यांची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 6106 ही दि. 14- 15 जुलै दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या राम सोलंकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
मुरुम : लक्ष्मण महादेव आडके, रा. मुरुम यांच्या ताब्यातील होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्स 8889 ही दि. 21- 22 जून दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या मोटारसायकल मालक- विवेकानंद गोविंदराव जाधव, रा. सुंदरवाडी, ता. उमरगा यांनी दि. 15 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web