लोहारा , उमरगा, तामलवाडी येथे चोरीची घटना
लोहारा - महादेव विजय गोरे, रा. लोहारा (बु.), ता. लोहारा यांच्या लोहारा येथील अनुष्का हॉटेलसमोरील टपरीच्या शटरचे कुलूप गावकरी- नितेश कांबळे व अन्य एक व्यक्ती या दोघांनी दि. 17- 18 जुलै दरम्यानच्या रात्री तोडून आतील सिगारेट पॉकेट व 1,500 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या महादेव गोरे यांनी दि. 19 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380, 461, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा - रेवनसिध्द सुरेश पुजारी, रा. उमरगा यांच्या उमरगा येथील ‘सागर मेडिकल व जनरल स्टोअर्स’ च्या शटरचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 18- 19 जुलै दरम्यानच्या रात्री तोडून आतील 20,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या रेवनसिध्द पुजारी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी - विनोद सुभाष लोंढे, रा. तामलवाडी यांनी तामलवाडी येथील आपल्या गॅरेज मध्ये ठेवलेला स्मार्टफोन अज्ञात व्यक्तीने दि. 19 जुलै रोजी 10.00 ते 11.30 वा. दरम्यान चोरुन नेला. अशा मजकुराच्या विनोद लोंढे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
लैंगीक छळ
उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावातील एक 35 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 18 जुलै रोजी 10.30 वा. सु. आपल्या राहत्या घरात असतांना गावातीलच एका पुरुषाने तीच्या घरात शिरुन तीला काठीने मारहान करुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केले. तसेच घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीला व तीच्या मुलास ठार मारण्यात येईल अशी तीला धमकी देउन घरातील दोन भ्रमणध्वनी घेउन गेला. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 327, 452, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहाणीचे दोन गुन्हे
ढोकी : शेषेराव नामदेव पौळ, रा. वाणेवाडी, ता. उस्मानाबाद हे दि. 19 जुलै रोजी 12.00 वा. सु. वाणेवाडी येथील आपल्या शेतातील सामाईक बांधावरुन जात होते. यावेळी सामाईक बांधावरुन रहदारीच्या कारणावरुन भाऊबंद- सुभाष पौळ, रामेश्र पौळ, मंगल पौळ अशा तीघांनी शेषेराव पौळ यांना शिवीगाळ करुन काठीने मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शेषेराव पौळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी : किरण गहिनीनाथ शिंदे, रा. पांगरधरवाडी, ता. तुळजापूर हे दि. 18 जुलै रोजी आपल्या घरासमोर असतांना गावकरी- रधुनाथ शिंदे, अक्षय शिंदे, नाना गाटे, युवराज चव्हाण, सचिन चव्हाण, महेश मते यांसह राळेरास, ता. बार्शी येथील प्रदिप निचळ, शंकर निचळ अशा आठ जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून शेतजमीन वाटनीच्या कारणावरुन किरण शिंदे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच काठी, पाईपने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या किरण शिंदे यांनी दि. 19 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.