ढोकी, नळदुर्ग, भाटशिरपुरा येथे चोरीची घटना
ढोकी : शाहीबाज जाफर कुरेशी, रा. दत्तनगर, ढोकी यांनी त्यांची बजाज सीटी मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएच 3620 ही दि. 25 जुलै रोजी 23.00 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी ती मो.सा. ठेवल्या जागी न आढळल्याने ती अज्ञाताने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या शाहीबाज कुरेशी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : नळदुर्ग येथील अफसान पेट्रोलियम विक्री केंद्राच्या भुमीगत डिझेल टाकीतील 905 लि. डिझेल तसेच केंद्राजवळच्या हिमायत अली शफिउल्ला मोजन यांच्या पंक्चर दुरुस्ती दुकानातील 35,000 ₹ किंमतीचे साहित्य दि. 25 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञाताने चोरुन नेले. यावरुन पेट्रोलियम विक्री केंद्राचे व्यवस्थापक- सोहेब काझी यांनी दि. 26 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : भाटशिरपुरा, ता. कळंब येथील सुमित गायकवाड यांच्या बंद घराचा कडी- कोयंडा दि. 24- 25 जुलै दरम्यान अज्ञाताने उचकटून आतील 33 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिन्यांसह 2 जुने स्मार्टफोन चोरुन नेले. अशा मजकुराच्या सुमित गायकवाड यांनी दि. 26 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दोन ठिकाणी हाणामारी
नळदुर्ग : सांगवी (मा.) येथील अनिल पवार व योगेश कोळी यांस नळदुर्ग येथील जरार कुरेशी व अन्य पाच अनोळखी पुरुषांनी पुर्वीच्या भांडणावरुन दि. 26 जुलै रोजी 11.00 वा. चिवरी (उ.) गावातून धाकदाखवून, कंबर पट्ट्याने मारहान करुन आय 20 कारमध्ये बसवून अक्कलकोट रस्त्यावर नेले. तेथे गेल्यावर नमूद लोकांनी पुन्हा त्या दोघांस मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अनिल पवार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 324, 363, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : वानेवाडी, ता. उस्मानाबाद येथील उत्तम व भिमाशंकर उंबरे या दोघा पिता- पुत्रांनी भाऊबंद गोरोबा उंबरे यांस दि. 25 जुलै रोजी 10.30 वा. पुर्वीच्या वादातून ठार मारण्याची धमकी देउन राहत्या गल्लीत काठीने मारहान केली. गोरोबा यांच्या बचावास त्यांचे पिता- रामचंद्र उंबरे हे आले असता त्यांनाही नमूद दोघांनी मारहान केली. अशा मजकुराच्या गोरोबा उंबरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.