तुळजापुरात मंगळसूत्र चोरणाऱ्या चार महिला चोर गजाआड 

 
Osmanabad police

तुळजापूर  : तुळजापुरात आई तुळजाभवानी पायरीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या एका महिलेच्या अंगावरील मंगळसूत्र चोरणाऱ्या चार महिला चोरट्याना पोलिसानी अटक केली आहे. 

वैजंताबाई नागुराव शिंदे, रा. वरवडा, ता. औसा या दि. 24 ऑगस्ट रोजी 12.00 वा. सु. तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीराच्या शहाजी महाद्वारासमोरुन मंदीराचे दर्शन घेत असतांना त्यांच्या गळ्यातील 2 ग्रॅम सुवर्णाचे मंगळसुत्र अज्ञात व्यक्तीने हिसकावताच वैजंताबाई यांनी आरडाओरड केला. यावेळी मंदीरासमोर साध्या पोशाखात बंदोबस्तास असलेल्या तुळजापूर पो.ठा. च्या अंमलदारांनी वैजंताबाई यांना विचारले असता त्यांच्या गळ्यातील दा‍गिने चोरी झाल्याचे पोलीसांना समजले. यावर पोलीसांनी गर्दीतील महिलांना ताब्यात घेउन विचारपुस करुन पुणे येथील 1) शारदा जाधव 2) कोमल गायकवाड 3) वैशाली गायकवाड 4) मिना गायकवाड यांना ताब्यात घेतले असता नमूद चोरीचा दागिना त्यांच्या ताब्यात आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.


जिल्ह्यात चोरीच्या पाच घटना 

उमरगा : मुळज येथील ग्रामस्थ काशिनाथ दत्तात्रय कुलकर्णी व शरद मुळजकर यांच्या दोघांच्या शेतातील अनुक्रमे कुलकर्णी यांच्या शेत विहीरीतील 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा व मुळजकर यांच्या शेत विहीरीतील 5 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप दि. 18- 19 ऑगस्ट दरम्यान अज्ञाताने चोरुन नेला. अशा मजकुराच्या काशिनाथ कुलकर्णी यांनी दि. 24 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : विजयमाला जाधव, रा. चिलवडी, ता. उस्मानाबाद या कुटूंबीयांसह दि. 23- 24 ऑगस्ट रोजीच्या रात्री आपल्या घरात झोपलेल्या होत्या. पहाटे 03.30 वा. पुर्वी जाधव यांच्या घराच्या उघड्या जिन्यावरुन अज्ञाताने आत प्रवेश करुन चार्जींगला लावलेले दोन भ्रमणध्वनी, 600 ₹ रोख रक्कम व पॅन कार्ड, आधार कार्ड, एटीएम कार्ड, लायसन्स चोरुन नेले. यावरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : नळदुर्ग येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या दुसऱ्या मजल्यावरील दरवाजा उघडा असलेल्या खोलीतील दुरदर्शन संच (टीव्ही) दि. 21- 23 ऑगस्ट दरम्यान अज्ञाताने चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रशाला कर्मचारी- चिदानंद स्वामी यांनी दि. 24 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : संगीता तुकाराम देडे, रा. चिंचोली, ता. तुळजापूर या दि. 21- 22 ऑगस्ट रोजी दरम्यान बाहेर गावी गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञाताने तोडून आतील 29 ग्रॅम सुवर्ण दागिने, चांदीचे जोडवे- चैन व 50,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. यावरुन संगीता देडे यांनी दि. 24 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत प्रतिक्षा पवार, रा. सोलापूर या दि. 24 ऑगस्ट रोजी 16.00 वा. तुळजापूर येथील लातूर रस्ता बसस्थानकातील बसमध्ये चढत असतांना अज्ञाताने गर्दीचा फायदा घेउन पवार यांची पर्स उघडून आतील 25 ग्रॅम वजनाचा सुवर्ण दागिना चोरुन नेला. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web