उस्मानाबाद जिल्ह्यात 11 गुन्ह्यात 13 आरोपींना आर्थिक दंडाची शिक्षा

 
उस्मानाबाद जिल्ह्यात 11 गुन्ह्यात 13 आरोपींना आर्थिक दंडाची शिक्षा

भुम: रविंद्र सोपान घुले यांनी मानवी जिवीतास तसेच रहदारीस अडथळा होईल अशा निष्काळजीपणे सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याबद्दल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, भुम यांनी 200 ₹ दंडाची शिक्षा 24 मार्च रोजी सुनावली आहे.

 कळंब: प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कळंब यांनी 24 मार्च रोजी खालील 3 गुन्ह्यांतील 5 आरोपींना दंडात्मक शिक्षा सुनावल्या. यात जुगार खेळून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) चे उल्लंघन केल्याप्ररकणी 2 गुन्ह्यातील 4 आरोपींना प्रत्येकी 300 ₹ दंडाची शिक्षा तर मानवी जिवीतास तसेच रहदारीस अडथळा होईल अशा निष्काळजीपणे सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याबद्दल एका व्यक्तीस 200 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

उस्मानाबाद (ग्रा.): विनायक चांगदेव देशमुख, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांनी कोविड- 19 संबंधी रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन करुन 20.00 वा. पानटपरी व्यवसायास चालू ठेउन भा.दं.सं. कलम- 269 चे उल्लंघन केल्याबद्दल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी 500 ₹ दंडाची शिक्षा 24 मार्च रोजी सुनावली आहे.

शिराढोन: विजयसिंह वैजनाथ गुमाने, रा. शिराढोन यांना जुगार खेळून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) चे उल्लंघन केल्याप्ररकणी 300 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कळंब यांनी 24 मार्च रोजी सुनावली आहे.

 आंबी: मानवी जिवीतास तसेच रहदारीस अडथळा होईल अशा निष्काळजीपणे सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याबद्दल एका व्यक्तीस 200₹ व बेदरकापणे, निष्काळजीपणे वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केल्याबद्दल एका व्यक्तीस 1,000 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी 24 मार्च रोजी सुनावली आहे.

तामलवाडी: बेदरकापणे, निष्काळजीपणे सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केल्याबद्दल एका व्यक्तीस 1,000 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर यांनी 24 मार्च रोजी सुनावली आहे.

परंडा: मानवी जिवीतास तसेच रहदारीस अडथळा होईल अशा निष्काळजीपणे सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याबद्दल अनिल पवार व आण्णासाहेब इंगळे यांना प्रत्येकी 200₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी 24 मार्च रोजी सुनावली आहे.

From around the web