उस्मानाबाद आणि माकणी येथे अवैध गुटखा जप्त

 
s

उस्मानाबाद  - उस्मानाबाद आणि माकणी येथे अवैध गुटखा विकणाऱ्या दोघांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने  छापा मारून ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. 

उस्मानाबाद आणि माकणी येथे महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटख्याची विक्री होत असल्याची गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पोनि- गजानन घाडगे यांच्या पथकास मिळाली होती. यावर स्था.गु.शा. च्या पोउपनि-  भुजबळ, माने, पोहेकॉ- साळुंके, ठाकुर, पोलीस नाईक हुसेन सय्यद,पोकॉ- जाधवर, आरसेवाड, होळकर यांच्या पथकाने आज दि. 25 जून रोजी दोन ठिकाणी छापे टाकले. 

यात माकणी, ता. लोहारा येथे विठ्ठल विश्वंभर मुसांडे हे 55,500 ₹ किंमतीचा तर मिल्ली कॉलनी, उस्मानाबाद येथे सलीम गफुरसाब तांबोळी हे 26,360 ₹ किंमतीचा गुटखा, सुगंधी सुपारी  अवैध विक्री व्यवसायास बाळगलेले आढळल्याने नमूद प्रतिबंधीत माल जप्त करण्यात आला. याविषयी अन्न व औषध प्रशासनास माहिती देण्यात आली असुन त्यांच्या अभिप्रायानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.


सात  गुन्ह्यातील सात आरोपींना आर्थिक दंडाच्या शिक्षा

उमरगा: उमरगा पो.ठा. येथे दाखल असलेल्या 7 गुन्ह्यातील 7 व्यक्तींना आज दि. 25 जून रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उमरगा यांनी  पुढील शिक्षा सुनावल्या.

सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस- जिवीतास धोका होईल असे निष्काळजीपनाचे कृत्य करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याप्रकरणी 1)दयानंद मानु चव्हाण, रा. बलसुर  2)शिवराज शंकर माळी, रा. गुंजोटी या दोघांना प्रत्येकी 300 ₹ दंडाची शिक्षा व 3)नेताजी किशनराव जमादार 4)संतोष शंकर माळी, रा. गुंजोटी 5)शरद सौदागर घाटे 6)लक्ष्मण चंदु मुळे या तीघांना प्रत्येकी 200 ₹ दंडाची शिक्षा आणि जुगार खेळून म.जु.का. कलम- 12 (अ) चे उल्लंघन केल्याप्रकरणी 7)सुरेश आबु राठोड यांना 300 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

From around the web