उमरग्यात अवैध डिझेल साठा जप्त

 
Osmanabad police

उमरगा: उमरगा एम.आय.डी.सी मधील श्री लक्ष्मी तिम्मप्पा फुड या कारखान्यावर उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने छापा टाकला. या वेळी तेथे अवैधरित्या 12,000 लिटर डिझेल एका टाकीत साठवलेले आढळल्याने पोलीसांनी नमुद डिझेल साठा, 2 विदयुत पंप असे सामान जप्त केले. या प्रकरणी पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरे वरुन महेश गवळी रा. कर्नाटक राज्य यांसह जागेच्या अज्ञात मालका विरुध्द जिवनावश्यक  कायदा कलम 3,7 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबादेत अवैध गुटखा प्रकरणी गुन्हा दाखल

उस्मानाबाद -  शासन प्रतिबंधीत गुटख्याची विक्री होत असल्याची गोपनीय खबर अन्न सुरक्षा  अधिकारी श्रीमती रेणुका पाटील यांना मिळाल्याने त्यांनी  दि. 26 जून रोजी उस्मानाबाद शहरातील एल.आय.सी. कार्यालयाजवळील एका दुकानात छापा टाकला . या वेळी मुजफ्फर पाशा शेख रा. समता वसाहत यांच्या ताब्यात 145 पुडे गुटखा अवैध बाळगला असल्याचे आढळले. या प्रक्रणी अन्न सुरक्षा  अधिकारी श्रीमती रेणुका पाटील यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरे वरुन भा.द.सं. व अन्न सुरक्षा व मानके कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण मध्ये जुगार विरोधी कारवाया

शिराढोण : जुगार चालु असल्याच्या गोपनीय खबरेवरुन शिराढोण पोलीसांनी दि. 25 जून रोजी 16.15 वा शिराढोण ग्रामपंचायत कार्यालया समोर छापा टाकला असता 1) गणपत वाघमारे 2) विशाल शिंदे 3) युवराज ठोंबरे 4) नितीन पाटील 5) लक्ष्मण बोराडे हे कल्याण मटका जुगार साहित्य बाळगुन जुगार खेळतांना 2,210 ₹ रोख रक्कमेसह  आढळले. यावरुन पोलीसांनी नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक  कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 अवैध मद्य विरोधी कारवाई

लोहारा: अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन लोहारा पो.ठा. च्या पथकाने दि. 25 जून रोजी मार्डी गावात  छापा टाकला असता  तुळशीराम देवकर हे आपल्या घरासमोर 180 मिली च्या 15 बाटल्या देशी दारु अवैधपणे  बाळगलेले आढळले.

नळदुर्ग: अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन नळदुर्ग  पो.ठा. च्या पथकाने दि. 25 जून रोजी शिरगापुर गावात  छापा टाकला असता  लक्ष्मण चिंचोले  हे आपल्या घरासमोर 22 लिटर शिंदी व 5 लिटर गावठी  दारु अवैधपणे  बाळगलेले आढळले.

            यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

अवैध गांजा विरोधी कारवाई

उमरगा: उमरगा  पो.ठा. च्या पथकाने दि. 25 जून रोजी 20.20 वा शहरातील जुन्या भारत शाळेच्या प्रांगणात   छापा टाकला असता  अप्पाराव बाबुराव पाटील रा. कदेर व सुभाष भानुदास कापसे रा. सिंदफळ  हे दोघे गांजा या अंमली पदार्थाचे अवैधपणे  सेवन करतांना  आढळले. यावरुन पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरे वरुन एन.डी.पी.एस कायदा कलम 8,27 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web