आंबी येथे अवैध गांजा जप्त 

 
Osmanabad police

 आंबी:  गोपनीय खबरे आधारे  आंबी  पो.ठा. च्या सपोनि- आशिष  खांडेकर यांच्या पथकाने  दि. 01 जूलै रोजी 19.53  वा जेजला, ता. भुम  येथे छापा टाकला. यावेळी पंडीत  व पोपट रामा पवार या दोघा भावांसह पुजा पोपट पवार असे तीघे जण आपल्या घरात गांजा या मादक वनस्पतीची  35 कि.ग्रॅ. वाळलेली पाने-फुले  अवैध व्यवसायास बाळगलेले आढळले.या वरुन पोलीसांनी नमुद गांजा जप्त करुन नमुद तिघां विरुध्द  एन डी पी एस कायदा कलम 8, 2 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
कोवीड मनाई आदेशांचे उल्लंघन प्रकरणी दोघांना आर्थिक दंडाची शिक्षा

उस्मानाबाद-  परंडा येथील मुजोददीन मुजावर व धनाजी गवारे यांनी कोवीड मनाई आदेशांचे उल्लंघन करुन,  मास्क न वापरता गर्दी जमवुन आपल्या  दुकानात  व्यवसाय करुन  भादसं कलम 188, 269  चे  उल्लंघन केल्या बददल दोघांना प्रत्येकी  एक हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी आज दिनांक 01 जुलै रोजी सुनावली आहे.

 कोवीड मनाई आदेशांचे उल्लंघन प्रकरणी पाच गुन्हे दाखल

उस्मानाबाद  : येरमाळा शिवारातील  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 लगतच्या हॉटेल बांगर बंधु व हॉटेल मुंढे बंधु  मध्ये दिनांक 01 जुलै रोजी 18.20 वा कोवीड मनाई आदेशांचे उल्लंघन करुन   हॉटेल चालक-भगवान बांगर व गोविंद मुंढे हे ग्राहकांना जेवण पुरवत असल्याचे येरमाळा पोलीसांना आढळले. तर परंडा येथे 19.10 वा आकिब डोंगरे, शफी मोमीन, सारंग खंडाळे हे मास्क न वापरता गर्दी जमवुन आपल्या  किराणा दुकानात  व्यवसाय करत असल्याचे परंडा पोलीसांना आढळले. यावरुन नमुद पाच व्यक्तीं विरुध्द भादसं कलम 188, 269 अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

 
गुटखा बाळगणा-यावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद  -   अन्न व औषध प्रशासनाच्य अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रेणुका पाटील यांनी  दि  30 जुन रोजी  सारोळा  गावातील मियाँसाहेब मिटु सययद फकीर यांच्या घरी छापा टाकला. यावेळी तेथे  महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ गुटख्याच्या 10,640 रु किमतीच्या  पुडया बाळगल्याने  दिनांक 01 जुलै रोजी  भादसं 328, 188,272, 273, सह वाचन  अधि नियम अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

From around the web