सार्वजनिक ठिकाणी गाड्यावर अग्नी प्रज्वलीत केला, 7 गुन्हे दाखल

 

उस्मानाबाद - मानवी जिवीतास धोका होईल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी हातगाड्यावर अग्नी प्रज्वलीत करुन तसेच बेदरकारपणे, निष्काळजीपणे वाहन चालवून- वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 285, 283, 279 चे उल्लंघन करणाऱ्या 7 व्यक्तींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे 7 गुन्हे उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी 22 मार्च रोजी दाखल केले.

(1) रविंद्र घुले, रा. वरुड, ता. भुम यांनी वाहन क्र. एम.एच. 20 एवाय 1842 हा पाथ्रुड बसस्थानक येथील रस्त्यावर तर जीवन मासाळ, रा. डुक्करवाडी, ता. भुम यांनी वाहन क्र. एम.एच. 25 आर 8638 हा रामेश्वर फाटा येथील रस्त्यावर रहदारीस धोकादायरित्या उभे केले असल्याचे भुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

(2) वालवड, ता. भुम येथील शिवलींग माळी यांनी वालवड येथील सार्वजनिक रस्त्यावर आपल्या हातगाड्यावर अग्नी प्रज्वलीत करुन मानवी जिवीतास धोका निर्माण होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य केल्याचे भुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

(3) शिराळा, ता. परंडा येथील जमिर शेख हे ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 45 ए 2087 हा देवगाव येथे सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे, हयगईने चालवत असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.

(4) अर्जुन काशीद, रा. केमवाडी, ता. तुळजापूर हे मो.सा. क्र. एम.एच. 25 एटी 0139 ही सांगवी (काटी) शिवारातील सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे, हयगईने चालवत असतांना तामलवाडी पो.ठा. च्या पथकास आढळले.

(5) हरीदास डोंगरे, रा. कोथळा, ता. कळंब यांनी ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 25 एफ 851 हा कोथळा फाटा येथील रस्त्यावर तर बाळासाहेब तनपुरे, रा. हिंगणगाव यांनी ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 23 एक्स 677 हा हिंगणगाव फाटा येथील रस्त्यावर रहदारीस धोकादायरित्या उभे केले असल्याचे शिराढोन पो.ठा. च्या पथकास आढळले.

“अपघात.”

नळदुर्ग: विकासकुमार हरीकीशन मीना, वय 21 वर्षे व मित्र- किशोरकुमार सैनी, वय 21 वर्षे, दोघे रा. सोलापूर (दक्षिण) हे 21 मार्च रोजी 13.15 वा. सु. नळदुर्ग- अणदुर रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 13 डीके 6250 ने जात होते. दरम्यान अणदुर येथील पाटाजवळ त्यांच्या मो.सा. ला पाठीमागून एसटी बस क्र. एम.एच. 14 बीटी 3481 ने धडक दिल्याने विकासकुमार मीना यांचा मृत्यु झाला तर किशोरकुमार सैनी यांना गंभीर दुखापत झाली. अशा मजकुराच्या किशोरकुमार सैनी यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन संबंधीत बसच्या अज्ञात चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
“मारहाण.”

परंडा: ब्रम्हदेव भारती, रा. शिराळा (मंजरी), ता. परंडा हे 20 मार्च रोजी 11.30 वा. सिना नदी पात्रात वाहनामध्ये वाळू भरत होते. दरम्यान त्यांचा पाय घसरल्याने हातातील घमेले गावकरी- समाधान अनिल कदम यांच्या अंगावर पडल्याने वाद उद्भवला. यात समाधान व रोहीदास कदम या दोघा भावांसह हनुमंत व निवास कदम, बाप्पा बोरकर यांनी ब्रम्हदेव भारती यांस लोखंडी गज, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याने ते बेशुध्द पडले. अशा मजकुराच्या ब्रम्हदेव भारती यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 504, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                            

From around the web