उस्मानाबादेतील विवाहित शिक्षिकेचा विनयभंग 

 
Osmanabad police

उस्मानाबाद - जिल्ह्यातील एका विवाहित शिक्षिकेचा विनयभन्ग करून तिला  आणि तिच्या पतीला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 गेल्या काही महिन्यांपासुन जिल्हयातील एक तरुण  मोटार सायकलने एका विवाहीत शिक्षिकेचा पाठलाग करत असे. दिनांक 06 जुलै रोजी त्याने त्या  महिलेच्या घरासमोर जाउन मोटारसायकल  इंजीनाची गती जोरजोरात कमी-जास्त करुन व मोटारसायकलचे भोंगे वाजवुन त्या महिलेचे चित्त वेधुन घेण्याचा प्रयत्न केला. यावर त्या महिलेसह तिच्या  पतीने त्यास हटकले असता त्या तरुणाने व त्या सोबत मोटारसायकलवर असलेल्या अन्य दोघा तरुणांनी त्या  पती- पत्नीस शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी देउन धक्काबुक्की केली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भादसं कलम  323, 354, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोदंविण्यात आलेला आहे.


सार्वजनिक ठिकाणी रहदारीस धोका निर्माण करणाऱ्या दोन व्यक्तींवर गुन्हे दाखल

 आंबी: रहदारीस धोका अडथळा निर्माण होईल अशा रितीने रस्त्यात वाहन  उभे करणा-याना आंबी पोलीसांनी दि. 07.07.201 रोजी संदीप अजिनाथ लांडे, रा.जेकटेवाडी यांनी त्यांचे ताब्यातील छोटा हत्ती क्रमांक एम एच 25 ए जे 0633 हे  तर  नाजुददीन ताजुददीन शेख, रा.अनाळा हे त्यांचे ताब्यातील  मिनीडोअर टमटम वाहन क्रमांत  एम एच 25 ए जे 0114 हे  रहदारीस धोका, अडथळा निर्माण होईल अशा रितीने रस्त्यावर  लावलेले असल्याचे आंबी  पोठाच्या पथकास आढळले वरुन भादसं कलम 283 अंतर्गत दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

 
सार्वजनिक ठिकाणी धोकादायक रित्या अग्नी प्रज्वलीत केले वरुन एकावर गुन्हा दाखल.

 आंबी:  रामचंद्र निवृत्ती पाबळे यांनी  दि. 07.07.2021 रोजी 13.30 वा अनाळा ते शेळगाव रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी लोखंडी टेबलवर गॅस शेगडी ठेवुन धोकादायकरित्या अग्नी प्रज्वलीत केला असल्याचे आंबी  पोठाच्या पथकास आढळले वरुन भादसं कलम 285 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

From around the web