आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री तानाजी सावंत रविवारी धाराशिव जिल्ह्यात 

असा आहे दौरा कार्यक्रम 

 
tanaji

धाराशिव - राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण,तथा जिल्हयाचे पालकमंत्री तानाजी सावंत  हे धाराशिव  जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे

रविवार दि. 26 मार्च 2023 रोजी दुपारी 04.00 वा. कात्रज पुणे येथून भैरवनाथ शुगर्स सोनारी ता.परंडा कडे प्रयाण. रात्री 09.00 वा.भैरवनाथ शुगर्स सोनारी ता.परंडा येथे आगमन व राखीव.

सोमवार दि.27 मार्च 2023 रोजी सकाळी 8.00 वा. भैरवनाथ शुगर्स सोनारी,ता.परंडा येथून अनाळा ता.परंडा कडे प्रयाण. सकाळी 8.10 वा. मौजे अनाळा ता.परंडा येथे आगमन व मौजे अनाळा येथे रस्त्याचे लोकार्पण सोहळा व पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण सोहळा. सकाळी  8.30 वा. मौजे अनाळा ता.परंडा येथून मौजे वालवड ता.भूम कडे प्रयाण. सकाळी 8.50 वा. जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर योजनेचे शुभारंभ. सकाळी 9.30 वा. मौजे वालवड ता.भूम येथून भूम शहराकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. भूम येथे आगमन व मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तीक शेततळयांच्या विशेष मोहिमेचा शुभारंभ. सकाळी 10.30 वा. जनता दरबार करिता उपस्थिती. दूपारी 1.00 वा. तहसील कार्यालय,भूम येथून मौजे हाडोंग्री ता. भूम कडे प्रयाण. दुपारी 1.10 वा. मौजे हाडोंग्री येथे आगमन व पोकरा या योजनेंतर्गत मंजूर सिमेंट नाला बंधाऱ्याचे भुमिपूजन.दुपारी 1.20 वा. श्री राम दरबार, श्री गणेश आणि श्री महादेव पिंड मुर्ती प्राणप्रतिष्ठा व सहा शिखर कलशा रोहन सोहळा निमित्त प्रमुख  उपस्थिती. दुपारी 1.50 वा मौजे हाडोंग्री भूमकडे प्रयाण. दुपारी 2.00 वा. भूम येथे आगमन व जनता दरबार करिता उपस्थिती (स्थळ: तहसील कार्यालय भूम). सायंकाळी 6.00 वा.भूम येथून शासकीय विश्रामगृह परंडाकडे प्रयाण. सायंकाळी 6.45 वा.शासकीय विश्रामगृह परंडा येथे आगमन. सायंकाळी 7.15 वा.शासकीय विश्रामगृह,परंडा येथून पंचायत समिती मैदान,परंडा कडे प्रयाण.सायंकाळी 7.20 वा. पंचायत समिती मैदान,परंडा येथे आगमन व आयोजित भव्य जंगी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास उपस्थिती.सायंकाळी 8.00 वा.पचायत समिती मैदान,परंडा येथून भैरवनाथ शुगर्स सोनारी कडे प्रयाण.रात्री 8.30 वा. भैरवनाथ शुगर्स सोनारी,ता.परंडा येथे आगमन व राखीव.

मंगळवार दि.28 मार्च 2023 रोजी सकाळी 8.30 वा.भैरवनाथ शुगर्स सोनारी,ता.परंडा येथून कै.बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती कामाची पाहणी.सकाळी 9.15 शिवजल क्रांती कामाची पाहणी (मौजे देवंग्रा ता. भूम येथील शिवजल क्रांतीची पाहणी). सकाळी 11.00 वा.मौजे देवंग्रा ता. भूम येथून उस्मानाबाद कडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह(जुने) येथे आगमन व राखीव. दुपारी 1.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबादकडे प्रयाण.दुपारी 1.05 वा.जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विषयाचा आढावा बैठक. दुपारी 2.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद येथून तुळजापूरकडे प्रयाण. दुपारी 3.00 वा. तुळजापूर येथे आगमन व तुळजाभवानीचे दर्शन दुपारी 3.00 वा.तुळजापूर येथून पंढरपूरकडे प्रयाण.

From around the web