पुण्याच्या ‘स्मार्ट इंडीया" नेटवर्कींग कंपनीकडून फसवणूक 

येणेगूरच्या लोकांना लागला २२ लाखाला चुना 
 
Osmanabad police

मुरुम : ‘स्मार्ट इंडीया प्रा. लि.’ या नेटवर्कींग स्वरुपाच्या योजनेमध्ये पैसे भरल्यास अधिक परतावा मिळेल असे आमिष कंपनीच्या संचालक मंडळातील पिंटु बजाज, ओमकार क्षिरसागर, विश्वास जाधव, अनिल कदम, अमित डांगे, श्रीनिधी शेंदुर्नीकर, सर्व रा. पुणे यांसह अन्य तीन व्यक्तींनी दाखवले होते. त्यास भुलून रमेश राठोड, रा. येणेगुर, ता. उमरगा यांसह शाम पवार, संगिता जाधव, महादेव बिराजदार यांनी त्या योजनेत सन- 2018- 19 मध्ये एकुण 22,00,000 ₹ रक्कम गुंतवणूक केली होती. परंतु संबंधीत संस्थेने त्यांना ठेवी व परतावा दिला नाही. यावरुन रमेश राठोड यांनी दि. 03 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 

 अतिक्रमण

वाशी :  गणेश शाळु, रा. भुम यांचे सरमकुंडी शिवार गट क्र. 125 अ मधील हॉटेल बांधकाम, हॉटेल साहित्य व कडुलिंब, बाभुळ अशी झाडे दि. 03 ऑगस्ट रोजी 13.00 वा. सरमकुंडी येथील चंद्रकांत गायकवाड यांनी खोदकाम ट्रॅक्टरच्या सहायाने तोडून आर्थिक नुकसान करुन गणेश यांना ठार मारण्याची धमकी देउन शिवीगाळ केली. अशा मजकुराच्या गणेश शाळु यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 447, 427, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
मारहाणीच्या दोन घटना 

तुळजापूर  : शेत जमीन वाटणीच्या कारणावरुन खंडाळा, ता. तुळजापूर येथील हरीओम शंकर पाटील यांना त्यांचा भाऊ- भावजय रामचंद्र व विजयालक्ष्मी यांसह पुतण्या- ओंकार यांनी दि. 19.06.2021 रोजी 14.00 वा. शेतात शिवीगाळ करुन लोखंडी गजाने, चपलेने, दगडाने मारहान केली. अशा मजकुराच्या हरीओम पाटील यांनी दि. 03 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : रविंद्र हरकर, रा. कळंब यांच्या कळंब येथील किराणा दुकानासमोर दि. 03 ऑगस्ट रोजी 09.00 वा. अजय, यशपाल, संघपाल गाडे या तीघा भावांसह भिमराव व धम्मपाल अशा पाच जणांनी भेळ विक्री हातगाडा लावला होता. तो गाडा दुकानासमोर लावण्यास रविंद्र यांनी आक्षेप घेतला असता नमूद पाच पुरुषांनी रविंद्र यांना शिवीगाळ करुन लोखंडी गज, दगड व चाकूने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रविंद्र हरकर यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506, 147, 148, 109 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web