क्रेडीट कार्डचे बील कमी देतो म्हणून फसवणूक
उस्मानाबाद : बावी (का.), ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- दत्तात्रय सुखदेव मनसुके यांच्या भ्रमणध्वनीवर दि. 9- 11 ऑगस्ट दरम्यान एका अनोळखी क्रमांकावरुन वेळोवेळी कॉल आले. तुमच्या क्रेडीट कार्डचे बील कमी करुन देण्याचे आश्वासन देउन त्याने मनसुके यांच्याकडून क्रेडीट कार्डची माहिती व क्रमांक विचारुन घेउन मनसुके यांच्या भ्रमणध्वनीवर आलेला लघू संदेशातील गोपनीय ओटीपी विचारला.
यावर मनसुके यांनी सारासार विचार न करता आपली क्रेडीट कार्ड विषयक माहिती व ओटीपी समोरील व्यक्तीस सांगीतला. या माहितीच्या सहायाने त्या समोरील अज्ञाताने मनसुके यांच्या क्रेडीट कार्डवरुन 1,82,268 ₹ रक्कम अन्यत्र स्थलांतरीत केली. अशा मजकुराच्या मनसुके यांनी दि. 21 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
चोरीचे चार गुन्हे दाखल
ढोकी : संजय लक्ष्मण घोरपडे, रा. आरणी, ता. उस्मानाबाद यांनी त्यांच्या शेत गोठ्यात ठेवलेली एक म्हैस दि. 20 ऑगस्ट रोजी 23.30 वा. सु. अज्ञाताने चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या घटनेत शेषेराव भिमराव खडके, रा. वाघोली यांच्या तेर येथील विद्युत मोटार रिवायडींग दुकानाचा पत्रा दि. 20- 21 ऑगस्ट दरम्यान अज्ञाताने उचकटून दुकानातील दुरुस्तीकरीता आलेले 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा- 1, 5 अश्वशक्ती क्षमतेचा- 1, 3 अश्वशक्ती क्षमतेचा- 1 पंपासह तांबे वायर 1 कि.ग्रॅ. असे इत्यादी साहित्य चोरुन नेले. यावरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : मथूरा नगर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आवारातील स.न. 380 मधील लोखंडी दरवाजा, विद्युत फलक, पाईप, वायर वेटोळी व पत्रे असे एकुण 16,120 ₹ चे साहित्य दि. 18- 20 ऑगस्ट दरम्यान अज्ञाताने चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या प्राधिकरण कर्मचारी- शाहेद सय्यद यांनी दि. 21 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : अविनाश सुभाष राठोड, रा. लेणी रोड, उस्मानाबाद यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 एस 7062 ही दि. 19 ऑगस्ट रोजी 16.50 राहत्या गल्लीत लावली असता ती अज्ञाताने चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.