उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना

कळंब: मोटारसायकल न दिल्याच्या कारणावरुन भुगाबाई किसन शिंदे, रा. मोहा, ता. कळंब यांना 25 मार्च रोजी 18.00 वा. सु. पारधी पिढी, मोहा येथे गावकरी- कालीदास आप्पा काळे, मई कालीदास काळे, पद्मीनबाई काळे यांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन विटाने मारहाण करुन जखमी केले व ठार माण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या भुगाबाई शिंदे यांनी 26 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद (ग्रा.): दत्तात्रय हरीभाउ खंडागळे, रा. भडाचीवाडी, ता. उस्मानाबाद हे 22 मार्च रोजी 19.30 वा. सु. येडशी- भडाचीवाडी असा मोटारसायकलने प्रवास करत असतांना येडशी टोलनाक्याजवळ त्यांना गणेश दिपक वाघमारे यांस अन्य एका अनोळखी व्यक्तीने दत्तात्रय खंडागळे यांना विनाकारण शिवीगाळ करु लागल्याने त्यांनी त्याचा जाब विचारला असता त्या दोघांनी दत्तात्रय यांना लाथाबुक्क्यांनी, बुटाने मारहाण केली. यात दत्तात्रय यांच्या नाकाचे हाड मोडल्याने गंभीर जखम झाली. अशा मजकुराच्या दत्तात्रय खंडागळे यांनी 26 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब: छाया नाना वरपे, रा. मस्सा, (ख.), ता. कळंब या मुलगा- महेश व सुन- उषा असे 26 मार्च रोजी 10.30 वा. सु. घरासमोरील जनावरांच्या गोठ्यात कोबा करत होते. यावेळी भुखंडाच्या मालकीच्या कारणावरुन भाऊबंद- अनुरथ वरपे, योगेश वरपे, दत्ता वरपे, संदीप वरपे, गणेश वरपे, बालाजी वरपे, अशोक वरपे, अरुण वरपे, बापु वरपे, कौशल्या वरपे, रुचिता वरपे अशा 11 जणांनी नमूद तीघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या छाया वरपे यांनी दिलेल्या प्रथम खबरेरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 परंडा: सागर देवळे, अनुप देवळे, आनंद देवळे, सविश देवळे, सर्व रा. परंडा यांनी 26 मार्च रोजी 15.30 वा. सु. परंडा येथील जामगाव शिवारातील शेतात शेत रस्त्याच्या कारणावरुन गावकरी- बाळासाहेब राजाराम गायकवाड यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली व लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या बाळासाहेब गायकवाड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web