उस्मानाबाद जिल्ह्यात १७ मार्च रोजी चोरीच्या चार घटना 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात १७ मार्च रोजी चोरीच्या चार घटना

शिरढोण : खामसवाडी, ता. कळंब येथील शशीकांत पाटील हे गावातील एका दुकानात 15 मार्च रोजी 20.30 वा. सु. खरेदी करत असतांना त्यांनी आपला स्मार्टफोन दुकानाच्या टेबलवर ठेवला होता. दरम्यान गर्दीचा फायदा घेउन अज्ञाताने तो स्मार्टफोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या शशीकांत पाटील यांनी 16 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद :  उस्मानाबाद येथील मंगेश उग्रसेन डावकरे यांची हिरो पॅशन प्रो मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एए 1078 ही 15 मार्च रोजी 11.40 वा. सु. उस्मानाबाद न्यायालयाच्या आवारातील चिंचेच्या झाडाखालून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या मंगेश डावकरे यांनी 16 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : उपळे (मा.), ता. उस्मानाबाद येथील निर्मला बिभीषन काकडे यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने 12- 14 मार्च रोजी दरम्यान तोडून आतील विविध सौंदर्य प्रसाधने व रोख रक्कम 20,000 ₹ असा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या निर्मला काकडे यांनी 16 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मुरुम: मुरुम, ता. उमरगा येथील राजु खासिम मोमीन यांच्या सुंदरवाडी गट क्र. 42/1,2 मधील शेतातील गोठ्यात असलेले जाफराबादी म्हशीचे मादी रेडकू शबाना मकबुल शेख, रा. सुंदरवाडी व सुजित कमलाकर चोपडे, रा. कोराळ या दोघांनी 15- 16 मार्च दरम्यानच्या रात्री चोरुन नेले. अशा मजकुराच्या राजु मोमीण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web