उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना

तामलवाडी: नागनाथ बाबुराव कोरेकर, रा. सांगवी (काटी), ता. तुळजापूर यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएफ 8566 ही 27 एप्रील रोजी 07.30 वा. सु. सांगवी (काटी) तलावाजवळून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या नागनाथ कोरेकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            तर दुसऱ्या घटनेत बालीका सुधाकर वडणे, रा. माळुंब्रा, ता. तुळजापूर यांच्या ताब्यात असलेली सांगवी (काटी) तलावातील लाडा कंपनीचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप अज्ञात व्यक्तीने दि. 24- 25 दरम्यानच्या रात्री चोरुन नेला. अशा मजकुराच्या बालीका वडणे यांनी 27 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 ढोकी: ढोकी, ता. उस्मानाबाद येथील आर.के. गुदामाच्या पाठीमागील बाजूचा पत्रा अज्ञात व्यक्तीने दि. 26 एप्रील रोजीच्या रात्री 01.00 ते 03.00 वा. चे दरम्यान उचकटून हरभरा बीज प्रक्रीयेच्या ‘जॅकी’ या वाणाची 32 पोती (किं.अं. 1,25,000 ₹) चोरुन नेली. यावरुन बीज प्रक्रीया केंद्र अभियंता- पंडीत विश्वनाथ जाधवा यांनी दि. 27 एप्रील रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 कळंब: परमेश्वर वसंत कोठावळे, रा. कोठाळवाडी, ता. कळंब हे दि. 26- 27 एप्रील रोजी रात्री 22.00 ते 00.30 वा. चे दरम्यान घरात झोपलेले असतांना गावातीलच राहुल नावाच्या तरुणाने त्यांच्या घराच्या भिंतीवरुन आत उडी मारुन घरातील भ्रमणध्वनी व खुंटीला अडकवलेल्या पिशवीतील रोख रक्कम 60,000 ₹ चोरुन नेली. अशा मजकुराच्या परमेश्वर कोठावळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web