कोवीड मनाई आदेशांचे उल्लंघन प्रकरणी जिल्ह्यात चार गुन्हे दाखल

 
Osmanabad police

ढोकी :कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी मास्क वापर, दुकाना संबंधी वेळेचे निर्बंध, सार्वजनिक स्थळी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर  ठेवण्यास आदेशित केलेले आहे. 

दिनांक 06.07.2021 रोजी 18.40 वा वाघोली रोडवर आबा पवार, पोपट पवार, सुरेश पवार, सिंकदर पवार, प्रकाश पवार, दादा पवार, सुनिल पवार, शिवाजी पवार, महादेव भडके सर्व रा.कसबे तडवळे यांनी नमुद आदेशांचे उल्लंघन करुन धार्मीक कार्यक्रमास लोक जमवुन गर्दी केल्याचे ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकास आढळले. तर दुस-या घटनेत ढोकी येथील सुरेश शरनार्थ यांनी  17.00 वा मास्क्‍ न वापरता गर्दी जमवुन आपले हॉटेल व्यवसायास चालु ठेवले. या प्रकरणी ढोकी पोलीसांनी दिलेल्या दोन  खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत दोन गुन्हे  नोंदविण्यात आले आहेत.

 परंडा : दिनांक 07.07.2021 रोजी 19.15 वा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,परंडा येथे भगवान दिलीप शेंडगे हे तोडांस मास्क्‍ न लावता 16.00 नंतर दुकान चालु ठेवुन व्यवसाय करत असल्याचे परंडा  पोलीस ठाण्याच्या पथकास आढळले. यावरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 बेंबळी :  गुणवंत वाघमारे यांनी  दिनांक 07.07.2021 रोजी  18.00 वा तोडांस मास्क्‍ न लावता केशेगाव येथील आपल्या किराणा दुकानात व्यवसाय करत असल्याचे बेंबळी पोलीस ठाण्याच्या पथकास आढळले. यावरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे

 
कोवीड मनाई आदेशांचे उल्लंघन प्रकरणी एकास शिक्षा

 कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी मास्क वापर, दुकाना संबंधी वेळेचे निर्बंध असे आदेशांचे उल्लंघन करुन मुस्ताफा खाजाहुसेन सौदागर, रा.बेबंळी येथे दिनांक 05.07.2021 रोजी, सौदागर हार्डवेअर हे विनामास्क्‍ व 16.00 नतंर चालु ठेवल्याचे बेबंळी पोलीस ठाण्याच्या पथकास आढळले.यावरुन पोलीसांनी दिले खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत गुन्हा नोंदवुन मा.न्यायालयात हजर केले असाता  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी,  उस्मानाबाद यांनी आज  1,000 रुपये दंड व दंड न भरल्यास एक दिवसाचा साधा कारावास ‍ हि शिक्षा सुनावली आहे.

From around the web