विविध गुन्ह्यातील चार आरोपींस आर्थीक दंडाची शिक्षा
आंबी : प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी आंबी पो.ठा. गु.र.क्र. 102, 74, 105, 87/ 2021 या चार गुन्ह्यात आज दि. 28 जुलै रोजी खालील प्रमाणे शिक्षा सुनावल्या.
यात कोविड-19 संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन करुन कोविड संसर्गाची शक्यता निर्माण करुन भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन केल्याप्ररकणी 1) आप्पु अनिल खर्डे, रा. वाटेफळ 2) बाबासाहेब हनुमंत बिबे, रा. कुक्कडगाव या दोघांना प्रत्येकी 500 ₹ दंड व दंड न भरल्यास तीन दिवस साध्या कारावासाची शिक्षा तसेच सार्वजनिक रस्त्यावर रहदारिस धोकादायरित्या वान उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याप्रकरणी 3)नाजोद्दीन ताजोद्दीन शेख, रा. आनाळा यांना 200 ₹ दंड व दंड न भरल्यास दोन दिवस साध्या कारावासाची शिक्षा आणि जुगार खेळुन म.जु.का. कलम- 12 (अ) चे उल्लंघन केल्याप्रकरणी 4) रामचंद्र सुदाम राऊत, रा. तांदुळवाडी यांना 300 ₹ दंड व दंड न भरल्यास दहा दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपने वाहन उभे करणाऱ्या चार चालकांवर गुन्हे दाखल
मुरुम : 1) अनिल बाबुराव मोहरकर, रा. कोथळी, ता. उमरगा यांनी दि. 27 जुलै रोजी 11.30 वा. सु. मुरुम येथील चौकात टाटा एस पिकअप क्र. एम.एच. 25 एजे 2409 हा सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या उभा केलेले तर 2) शिवाजी महादेव बुवा 3) राहुल शिवाजी सोनकांबळे, दोघे रा. भोसगा, ता. लोहारा 4) विलास रंगा कदम, रा. जळकोटवाडी, ता. तुळजापूर या तीघांनी 14.45 वा. सु. येणेगुर येथे सार्वजनिक रस्त्यावर तीन वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या ताब्यातील ॲपे रिक्षा रहदारीस धोकादायरित्या उभा केले असलेले मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.
यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद चौघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत स्वतंत्र 4 गुन्हे नोंदवले आहेत.