उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या पाच घटना 

 

लोहारा: भारतबाई देविदास राठोड, रा. हिप्परगा (रवा), ता. लोहारा यांच्या राहत्या घराचे कुलूप गावकरी- राहुल लालु राठोड यांनी 22 मार्च रोजी 18.00 वा. सु. तोडून घरातील 15 ग्रॅम सोन्याचे दागिने व 60,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या भारतबाई राठोड यांनी 23 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदेवला आहे.

उस्मानाबाद :  यशवंतनगर, सांजा येथील तानाजी लक्ष्मण पवार यांची टीव्हीएस ज्युपीटर स्कुटर क्र. एम.एच. 25 एटी 7430 ही 19- 20 मार्च दरम्यानच्या रात्री त्यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या तानाजी पवार यांनी 23 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा: संजय लक्ष्मण पवार, रा. सिरसाव, ता. परंडा हे कुटूंबीयांसह 22 मार्च रोजी रात्री घराचा दरवाजा उघडा ठेउन झोपले होते. ही संधी साधून अज्ञात व्यक्तीने 23 मार्च रोजी 02.00 ते 04.00 वा. चे दरम्यान घरातील 18 ग्रॅम सोन्याचे दागिने, साड्या- 11 नग व 11,100 ₹ रोख रक्कम असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या संजय पवार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग: नालंदा डिकोजी पाटील, रा. हागलुर, ता. तुळजापूर हे 23 मार्च रोजी 12.30 वा. सु. नळदुर्ग येथील एका केश कर्तनालयात केश कर्तन करत असतांना त्यांनी बाजूस टेबलवर ठेवलेली 10,000 ₹ रक्कम असलेली त्यांची बॅग अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या नालंदा पाटील यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 नळदुर्ग: इंदीरानगर, नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील भाग्यश्री गोपीनाथ रणे या 12 मार्च रोजी 09.30 वा. सु. घराचा दरवाजा उघडा ठेउन दुकानात गेल्या होत्या. ही संधी साधून अज्ञाताने आतील कपाटावर ठेवलेली 15,000 ₹ रक्कम, 1.5 ग्रॅम सोन्याचे- चांदीचे दागिने व पॅनकार्ड असेली पर्स चोरुन नेली. अशा मजकुराच्या भाग्यश्री रणे यांनी 23 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web