शिराढोणमध्ये लग्नासाठी आर्थिक फसवणूक 

 
Osmanabad police

शिराढोण - 1)प्रेमदास जाधव 2)धनाजी जाधव 3)पद्मीनी जाधव 4)अविनाश जाधव, चौघे रा. सेवापुर तांडा, आष्टाकासार, ता. चाकुर 5)भीमराव राठोड, रा. शिराढोन 6)संजय राठोड, रा. जानवळ तांडा 7)माणिक पवार, रा. लातुर या सर्वांनी संगणमताने मायादेवी जिवाजी राठोड, रा. लामण तांडा, शिराढोन, ता. कळंब यांना लग्नाचे अमिष दाखवत होते. यातुन दि. 12.02.2021 रोजी 13.00 वा. सु. मायादेवी यांच्याकडून लग्न खर्चासाठी 2,50,000 ₹ रोख रक्कम व 5 ग्रॅम सोन्याची अंगठी घेतली होती. 

यानंतर नमूद सात जणांनी वाहन, जमीन खरेदीसाठी मायादेवी यांच्याकडे वेळोवेळी पैशाची मागणी करण्यास सुरवात केली. वारंवार पैशाची मागणी होत असल्याने मायादेवी राठोड यांनी त्यांना लग्नास नकार दिला असता त्यांनी मायादेवी यांना घेतलेले पैसे व अंगठी परत देन्यास नका दिला. अशा मजकुराच्या मायादेवी राठोड यांनी दि. 02 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरी 

कळंब: विष्णु तुकाराम कोल्हे, रा. हावरगांव, ता. कळंब  यांच्या हावरगांव गट क्र. 82 मधील शेतातील जलसिंचन पंपाचे साहित्य सोलार पॅनल, सोलार पाटी, स्टार्टर असे साहित्य दि. 31.05.2021 ते 01.06.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या विष्णु कोल्हे यांनी दि. 02 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत दिलीप पांडुरंग गंभीरे, रा. ईटकुर, ता. कळंब यांनी त्यांच्या ताब्याती बजान डिस्कव्हर मोटारसायकल क्र. एम.एच. 20 डब्ल्यु 5477 ही दि. 27.05.2021 रोजी 21.00 वा. सु. गावातील जगदंबा बिअर बार समोरल लावली होती. दुसऱ्या दिवशी ती त्यांना लावल्या जागी न आढळल्याने ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली असावी. अशा मजकुराच्या दिलीप गंभिरे यांनी दि. 02 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मनाई आदेश झुगारुन दुकान चालू ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल

उमरगा: कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी जारी केलेले मनाई आदेश झुगारुन नितीन विश्वनाथ जाधव, रा. एकोंडी रोड, उमरगा यांनी दि. 02 जून रोजी 18.30 वा. सु. उमरगा येथील आपले ‘बालाजी बेकर्स ॲन्ड जनरल स्टोअर्स’ दुकान व्यवसायास चालू ठेउन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web