कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 

उस्मानाबाद - मानवी जिवीतास, रहदारीस धोका होईल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे वाहन उभे करणाऱ्या, मालवाहतुक करणा-या , सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे अग्नी प्रज्वलीत करणाऱ्या, कोविड- 19 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने जारी केलेले विविध मनाई आदेश झुगारुन दुकान- हॉटेल व्यवसायासाठी चालू ठेवणाऱ्यांवर उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी संबंधीत पो. ठा. येथे 07 एप्रील रोजी खालील प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.

उस्मानाबाद : चालक - गणेश झाडे रा.उस्मानाबाद यांनी 07 एप्रील रोजी 13.30 वा. वाघोली रस्त्यावर ॲटो रिक्षा मध्ये रहदारीस , मानवी जिवीतास  धोका होईल अशा पध्दतीने लोखंडी पलंग वाहतुक करुन भा.दं.सं. कलम- 283 उल्लंघन केले.

 मुरुम : चालक - गणेश सुर्यवंशी रा.उमरगा यांनी 07 एप्रील रोजी 17.15 वा. उमरगा रस्त्यावर ॲटो रिक्षा रहदारीस , मानवी जिवीतास  धोका होईल अशा पध्दतीने उभा  करुन  भा.दं.सं. कलम- 283 उल्लंघन केले.

 परंडा : खमर तुटके रा.परंडा यांनी 07 एप्रील रोजी 18.30 वा. परंडा गावात  हातगाडीवर मानवी जिवीतास  धोका होईल अशा पध्दतीने शेगडीत अग्नी प्रज्वलीत करुन  भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले. तर लालाखॉ पठाण व जाफर सय्यद यांनी  प्रशासनाचे मनाई आदेश झुगारुन अनुक्रमे आपले हॉटेल  व पानटपरी व्यवसायास चालु ठेवुन भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन केले.

 
 बेंबळी:
रंगनाथ जावळे रा.मेंढा यांनी 07 एप्रील रोजी 16.00 वा. प्रशासनाचे मनाई आदेश झुगारुन मेंढा येथील आपली पानटपरी व्यवसायास चालु ठेवुन भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन केले.

From around the web