प्रतिबंधीत अन्नपदार्थ (गुटखा) बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद : दिपक गोपीनाथ जानराव, रा. उस्मानाबाद यांनी मध्यवर्ती इमारतीजवळील आपल्या ‘डी.जे. हॉटेल’ मध्ये प्रतिबंधीत अन्नपदार्थ (गुटखा) विक्रीसाठी बाळगला असल्याच्या गोपनीय खबरेवरुन आनंदनगर पो.ठा. च्या पथकाच्या पथकाने दि. 27 मे रोजी 11.00 वा. सु. छापा टाकला. यावेळी दिपक जानराव यांच्या ताब्यातत 800 ₹ किंमतीचा गुटखा व तंबाखु जन्‍ पदार्थ आढळला.

            यावर पोलीसांनी सदर गुटखा जप्त करुन अन्न औषध प्रशासनास माहिती कळवली असता अन्न सुरक्षा अधिकारी- श्रीमती रेणुका पाटील यांनी सदर अन्न पदाथ हा प्रतिबंधीत गुटखा असल्याची खात्री  करुन सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 272, 273 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 26, 27 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मनाई आदेश झुगारुन दुकान चालू ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद - मुक्तार निसार कुरेशी, रा. खिरणीमळा, उस्मानाबाद यांनी दि. 27 मे रोजी 13.00 वा. सु. मदीना चौक, उस्मानाबाद येथील मटन दुकान व्यवसायास चालू ठेउन कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी जारीकेलेल्या विविध मनाई आदेश झुगारुन भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उस्मानाबाद (श.) पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाया

 नळदुर्ग: अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने दि. 27 मे रोजी पोलीस ठाणे हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यात पहिल्या घटनेत नटराज रामा राठोड, रा. रामतिर्थ तांडा, ता. तुळजापूर हे तांड्यावरील अंबिका हॉटेल मध्ये अवैध विक्रीच्या उद्देशाने विदेशी दारुच्या 9 बाटल्या (किं.अं. 3,200 ₹) बाळगलेले तर दुसऱ्या घटनेत त्याच तांड्यावरील नंदकुमार शंकर पवार हे आपल्या राहत्या घरासमोर 20 लि. गावठी दारु (किं.अं. 1,200 ₹) अवैधपणे बाळगलेले असतांना पथकास आढळले.

उमरगा: लालय्या तेलंग, रा. डिग्गी, ता. उमरगा हे दि. 26 मे रोजी आपल्या राहत्या शेडसमोर 20 लि. गावठी दारु (किं.अं. 1,200 ₹) अवैधपणे बाळगलेले असतांना उमरगा पो. ठा. च्या पथकास आढळले.

            यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web