व्हॅट कर चुकवेगीरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
व्हॅट कर चुकवेगीरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

परंडा: उस्मानाबाद येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयाच्या पथकाने परंडा येथील मंडई पेठेतील मे. साई एजन्सीजचे आर्थिक व्यवहार- उलाढाल तपासली असता त्यांनी सन- 2007-8 वर्षाकरीता मुल्यवर्धीत कर (व्हॅट) चुकवला असल्याचे आढळले. यावर नमूद कर रक्कमेसह दंड व त्यावरील व्याज 13,72,324 ₹ भरण्याबाबत चालक- गणेश हरीचंद कतरेला यांना वेळोवेळी सुचित करण्यात आले असतांनाही त्यांनी कर भरणा केला नाही. यावरुन वस्तु व सेवा कर कार्यालयातील राज्य कर निरीक्षक श्री प्रकाश जमादार यांनी महाराष्ट्र मुल्यवर्धीत कर कायदा कलम- 74 (2) अंतर्गत दिलेल्या प्रथम खबरेवरुन एजन्सी चालक- गणेश हरीचंद कतरेला यांच्याविरुध्द 01 एप्रील रोजी गुन्हा नोंदवला आहे.

चोरी 

उमरगा: विजयकुमार बाबुराव परांडे, रा. माडज, ता. उमरगा यांच्या माडज गट क्र. 216/02 मधील शेत विहीरीतील अजेंटा कंपनीचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप अज्ञात व्यक्तीने दि. 31.03.2021 ते 01.04.2021 रोजी दरम्यानच्या रात्री चोरुन नेला. अशा मजकुराच्या विजयकुमार परांडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 परंडा: श्रीहरी निवृत्ती हजारे, रा. काशीद गल्ली, परंडा यांनी आपली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एई 8027 ही 30 मार्च रोजी 21.30 वा. सु. परंडा येथील बावची रस्त्यालगत लावली होती. ती दुसऱ्या दिवशी सकाळी लावल्या जागी न आढळल्याने ती अज्ञाताने चोरली असावी. अशा मजकुराच्या श्रीहरी हजारे यांनी 01 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web