लासोना, कपिलापुरी, धारुर,उमरगा येथे चोरीचा गुन्हा दाखल 

 
Osmanabad police

बेंबळी  : लिंबराज श्रीरंग पवार, रा. लासोना, ता. उस्मानाबाद हे दि. 12- 13 ऑगस्ट च्या रात्री त्यांच्या बांधकाम चालू असलेल्या घरासमोर झोपले असता पहाटे 03.00 च्या सुमारास लिंबराज पवार यांच्या उशाचा स्मार्टफोन अज्ञाताने चोरुन नेला. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
परंडा  : बाहुबली कवठे, रा. कपिलापुरी, ता. परंडा यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञाताने दि. 31.08.2021 ते 01.09.2021 दरम्यानच्या रात्री तोडून घरातील 40 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, एक एलईडी टीव्ही व एक स्मार्टफोन असे साहित्य चोरुन नेले. यावरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : आण्णासाहेब बंडगर, रा. धारुर, ता. उस्मानाबाद यांनी त्यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एसी 3283 ही दि. 31.08.2021 रोजी 09.20 ते 18.30 वा. दरम्यान उस्मानाबाद न्यायालयाच्या आवारात लावून न्यायालयात कर्तव्यावर गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांची नमूद मोटारसायकल अज्ञाताने चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : नागनाथ यशवंत भोसले, रा. एसटी कॉलनी, उमरगा हे दि. 31.08.2021 ते 01.09.2021 दरम्यान बाहेर गावी गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञाताने तोडून घरातील 10 ग्रॅम वनाचे सुर्वण दागिने व 160 ग्रॅम चांदीचे दागिने, वस्तू चोरुन नेल्या. यावरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरीच्या स्मार्टफोनसह आरोपी अटकेत

उस्मानाबाद  : भ्रमणध्वनी चोरीस गेल्याने उस्मानाबाद (श.) पो. ठा. येथे गु.र.क्र. 146 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 379 नुसार दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात सायबर पोलीस ठाणे, उस्मानाबाद यांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारे तांत्रीक विश्लेषन करण्यात आले. शेवटी स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री पांडुरंग माने, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- आरसेवाड, मारलापल्ले, कावरे यांच्या पथकाने साठे चौक, उस्मानाबाद येथील विठ्ठल पवार या 21 वर्षीय तरुणास चोरीच्या स्मार्टफोनसह आज दि. 02 सप्टेंबर रोजी ताब्यात घेउन उस्मानाबाद (श.) पो. ठा. च्या ताब्यात दिले आहे.

From around the web