मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणाऱ्यावर गुन्हा दाखल

उमरगा: नागनाथ गोपाळराव पाटील, रा. हिप्परगा राव, ता. उमरगा याने दि. 14.05.2021 रोजी 02.00 वा. सु. खसगी येथील सार्वजनिक रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत मोठमाठ्याने आरडा- ओरड करुन गोंधळ घालून महाराष्ट्र मद्य निषेध कायदा कलम- 85 (1) चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

प्राण्यांची निर्दयतेने वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 तुळजापूर: 1)विकास वसंत गाटे, रा. काटी, ता. तुळजापूर 2)अकबर नसीर कुरेशी, रा. कुरेशी गल्ली, नळदुर्ग हे दोघे दि. 14.05.2021 रोजी 17.30 वा. सु. सिंदफळ येथील पर्यायी मार्गाने अशोक लेलँड वाहन क्र. एम.एच. 25 एजे 0074 मध्ये जनावरे दाटीवाटीने भरुन त्यांच्या चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयतेने वाहतुक करत असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन तुळजापूर पो.ठा. चे पोलीस अंमलदार- प्रशांत म्हेत्रे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द प्राण्यांना क्रुरतेने वागणुकीस प्रतिबंध कायदा कलम- 11 (1) (ए) (डी) (एच) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 119 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
चोरी

 तामलवाडी: हनमंत सदाशिव सरडे, रा. नांदुरी, ता. तुळजापूर यांच्या शेत विहीरीतील लक्ष्मी कंपनीचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप व 700 फुट वायर दि. 13- 14.05.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या हनमंत सरडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
बेंबळी: कदीर खलील शेख, रा. मेंढा, ता. उस्मानाबाद यांच्या राहत्या घरात अज्ञात व्यक्तीने दि. 12- 13.05.2021 दरम्यानच्या रात्री प्रवेश करुन घरातील कपाटात ठेवलेले 21 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एक स्मार्टफोन असा एकुण 63,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या कदीर शेख यांनी दि. 14 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 अपघात 

 उमरगा: चालक- कुंडलीक दशरथ भांगे, रा. लातूर यांनी दि. 13.05.2021 रोजी 17.30 वा. सु. एकुरगा रस्त्याजवळ लक्ष्मीपाटी येथे हायवा वाहन क्र. एम.एच. 25 यु 5465 हा निष्काळजीपणे चालवून प्रशांत उमाकांत घाटे, वय 17 वर्षे, रा. गुंजोटी (औ.), ता. उमरगा हे चालवत असलेल्या मोटारसायकल क्र. एम.एच. 13 एके 1524 ला पाठीमागून धडक दिली. या अपघातात प्रशांत घाटे हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचे नातेवाईक- दिलीप साधु घंटे, रा. कोरगाववाडी, ता. उमरगा यांनी दि. 14 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web