सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : 1) ईस्माईल जिलानी शेख, रा. येडशी यांनी दि. 14 ऑगस्ट रोजी 12.30 वा. सु. येडशी टोलनाक्याजवळील आपल्या हॉटेल मध्ये निष्काळजीपने, हयगईने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळले. तर 2) मनोजकुमार मोहन होरे, रा. बोडका, ता. परंडा यांनी याच दिवशी परंडा येथील सार्वजनिक रस्त्यावर 12.30 वा. सु. आपली मोटारसायकल रहदारीस धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपने भर रस्त्यात उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

 
सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्यावर गुन्हा दाखल

कळंब : चालक- दत्ता मुंढे, रा. उपळाई हे एस.टी. बस क्र. एम.एच. 20 बीएल 3168 ही  दि. 13 ऑगस्ट रोजी 18.45 वा. सु. कळंब येथील छ. शिवाजी महाराज चौकातून कळंब बसस्थानकात बस नेत असतांना कळंब ग्रामस्थ- फिरोज पाशा बागवान यांनी एस.टी. एसच्या समोरील काच दगड फेकून मारुन फोडल्याने अंदाजे 12,000 ₹ चे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या दत्ता मुंढे यांनी दि. 14 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 336, 427 सह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम- 3 (2) (ई) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web