लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा गुन्हा दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद - सुर्यास्त ते सुर्योदयादरम्यान गौण खनिज उतखन्न व वाहतूकीस मनाई असल्याने उस्मानाबाद महसुल कार्यालयाचे पथक दि. 19 ऑगस्ट रोजी अवैध गौण खनिज विरोधी मोहिमेवर होते. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरील वडगांव (सि.)उड्डाण पुलाजवळ 20.00 वा. सु. वरवंटी गावाकडून महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या टिप्पर क्र. एम.एच. 25 यु 1107 व एम.एच. 14 इएम 6327 ची पथकाने तपासणी केली असता त्या दोन्ही टिप्परमधून गौण खनिज (मुरुम) वाहतूक होत असल्याचे आढळले. यावर पथकाने कारवाईसाठी ते टिप्पर रस्त्याबाजूस घेण्यास सांगीतले असता दोन्ही चालकांनी पथकास हुलकावनी देउन वाहनासह पोबारा केला. यावरुन महसुल विभागाचे- बाळासाहेब डोके यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 353 सह महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम कलम- 48 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अतिक्रमण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

लोहारा : सास्तुर, ता. लोहारा येथील विनायक मारुती बारकुळे व योगेश बारकुळे या दोघा पिता- पुत्रांनी दि. 02.07.2021 रोजी 10.00 वा. सु. गावातील शेत शेजारी- मनमथाप्पा सिद्राम कुर्ले यांच्या 130 / 02 मधील 20 गुंटे शेत जमीनीवर अतिक्रमण करुन पेरणी केली. याचा जाब कुर्ले यांनी नमूद बारकुळे पिता- पुत्रांस विचारला असता त्या दोघांनी कुर्ले यांना पुन्हा शेताता आल्यास ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन भा.दं.सं. कलम- 447, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web