लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद  -  महावितरण  कर्मचारी- संजय नानु पवार हे दि. 17 जुलै रोजी 16.30 वा. सु. तेरणा महाविद्यालय चौक, उस्मानाबाद येथून कार्यालयीन कामानिमीत्त जात असतांना उस्मानाबाद येथील सोमनाथ बालाजी पांढरे यांनी “माझ्या घराचे विज जोडणी का तोडली पुन्हा आमच्या परिसरात फिरायचे नाही.” असे संजय पवार यांना धमकावून शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. अशा प्रकारे त्यांनी संजय पवार यांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन संजय पवार यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मारहाणीचे तीन गुन्हे दाखल 

उस्मानाबाद  - येडशी येथील डॉ. श्रीमती कांचन यांनी पती- डॉ. अरुण मोरे यांच्याविरुध्द  घटस्फोटाचा दावा दाखल केला असुन त्याच्या सुनावनीस कांचन या दि. 17 जुलै रोजी उस्मानाबाद न्यायालयात भाऊ- प्रथमेश व आपल्या दोन मुलींसह आल्या होत्या. यावेळी पती- अरुण यांनी पत्नी- कांचन हिला न्यायालयातून घटस्फोटाचा दावा मागे घेण्यास धमकावले असता  कांचन यांनी नकार दिला. सुनावनी नंतर भाऊ- प्रथमेश मोहिते याच्या कारमधून कांचन व त्यांच्या दोन्ही मुली येडशीकडे जाउ लागले असता पोदार शाळेसमोरील रस्त्यावर एका मोटारसायकलवरील दोघा अनोळखी पुरुषांनी प्रथमेश मोहिते यांची कार अडवून कारवर व प्रथमेश यांच्यावर दगडफेक केल्याने कारचे नुकसान होउन प्रथमेश हे जखमी झाले. अशा मजकुराच्या प्रथमेश मोहिते यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 341, 506, 427, 109 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 तामलवाडी : पांगरधरवाडी, ता. तुळजापूर येथील सत्यवान गोपीनाथ शिंदे यांना शेत जमीनीच्या वादावरुन दि. 17 जुलै रोजी 15.00 वा. सु. सांगवीकाटी शिवारात भाऊबंद- किरण गहिनीनाथ शिंदे यांनी शिवीगाळ करुन विळ्याने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सत्यवान शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 352, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा : भोत्रा, ता. परंडा येथील शेलार कुटूंबातील रोहिदास, गणेश, पिंटु, सुनिता, स्नेहा, स्वाती अशा सहा जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून पुर्वीच्या भांडण- तक्रारीवरुन दि. 16 जुलै रोजी 17.30 वा. सु. राहत्या गल्लीत भाऊबंद- हनुमंत अनंता शेलार यांसह त्यांच्या कुटूंबीयांस शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या हनुमंत शेलार यांनी दि. 17 जुन रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  

From around the web